त्रिचनगुड, तामिळनाडू येथे १४ ते १८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या ६२ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून, नितीन मदने आणि अभिलाषा म्हात्रे यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी महिलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर पुरुष संघाला उपउपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा दमदार खेळ करीत कामगिरी सुधारण्याचा महाराष्ट्राच्या संघाचा प्रयत्न असेल. विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी जेतेपद पटकावले होते. निवड झालेल्या संघाचे शिबिर बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होत आहे.
संघ- पुरुष : नितीन मदने, काशिलिंग आडके (दोन्ही सांगली) रिशांक देवाडिगा, आरिफ जहागीर, विकास काळे, शैलेश गराळे (चौघेही मुंबई उपनगर), विराज लांडगे (पुणे), दीपक झझोट (मुंबई शहर), सागर खटाळे (कोल्हापूर), कुलभूषण कुलकर्णी (रत्नागिरी), महेंद्र राजपूत (धुळे) किरण चांदेरे (पुणे)
महिला : अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर (मुंबई उपनगर) किशोरी शिंदे, स्नेहल शिंदे, शिवनेरी चिंचवले, पूजा शेलार (चौघीही पुणे), स्नेहल साळुंखे, सुवर्णा बारटक्के (दोघी मुंबई शहर) ज्योती देवकर (सांगली), सोनी जायभाय (औरंगाबाद), अरुणा सावंत (कोल्हापूर) निकिता कदम (ठाणे)