Naveen Ul Haq revealed about the controversy: आयपीएल २०२३ मध्ये, १ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर मैदानावर वाद झाला होता. हा वाद आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणिएलएसजीचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यात झाला होता.यानंतर एलएसजीचा मेंटॉर गौतम गंभीरनेही या वादात उडी घेतली होती. आयपीएलच्या १६ व्या मोसमातीव ही बाब सर्वात वादग्रस्त ठरली होती. आता आयपीएल संपल्यानंतर विराटसोबतच्या वादाबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.
नवीनने केला मोठा खुलासा –
एलएसजीचा गोलंदाज नवीनने या वादांवर मोठा खुलासा केला आहे. नवीन म्हणाला की, त्याने वाद सुरू केला नसून सामना संपल्यानंतर कोहलीनेच भांडण सुरू केले. नवीनने बीबीसीला सांगितले की, “त्याने हे सर्व सामन्यादरम्यान आणि नंतर बोलायला नको होते. मी वाद सुरू केला नाही. सामना संपल्यानंतर जेव्हा आम्ही हस्तांदोलन करत होतो, तेव्हा विराट कोहलीने भांडण सुरू केले.”
दंड बघून भांडण कोणी केले हे समजू शकते –
दंड बघून भांडण कोणी केले हे समजू शकते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. नवीनला त्याच्या मॅच फीच्या अर्धा दंड तर कोहलीला त्याच्या फीच्या १००% दंड ठोठावण्यात आला. अफगाणिस्तानचा गोलंदाज म्हणाला की, “पेनल्टी पाहिल्यावर तुम्हाला समजेल की वाद कोणी सुरू केला.”
हेही वाचा – MS Dhoni Brother: एमएस धोनी पहिल्यांदाच दिसला भावासोबत, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
मी कोणाला स्लेजिंग करत नाही –
नवीन म्हणाला की तो सहसा कोणावरही स्लेज करत नाही. तो म्हणाला की, “मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की, मी सहसा कोणालाही स्लेजिंग करत नाही आणि जरी मी करत असलो तरी मी गोलंदाजी करत असतानाच फलंदाजांना करतो. कारण मी गोलंदाज आहे. त्या सामन्यात मी काहीच बोललो नाही. एक शब्दही नाही.”
हस्तांदोलन करताना विराटने –
नवीन म्हणाला की म्हणाला, “मी फलंदाजी करताना किंवा सामन्यानंतर कधीच माझा संयम गमावला नाही. सामन्यानंतर मी काय केले ते प्रत्येकजण पाहू शकतो. मी फक्त हस्तांदोलन करत होतो आणि नंतर कोहलीने माझा हात घट्ट पकडला आणि मी देखील एक माणूस आहे आणि मी पण त्याला उत्तर दिले. “