टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत नेदरलँड्स संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवू शकला नाही. यामुळे निराश झालेल्या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रायन टेन डोश्काटेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात नेदरलँड्स नामिबियाकडून पराभूत झाला. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात डोश्काटे दिसला नाही.

क्रिकेट नेदरलँड्सने जारी केलेल्या निवेदनात डोश्काटेने म्हटले आहे, की हा एक कठीण दौरा होता, परंतु संघाचा भाग असणे चांगले होते. या संघाची व्यावसायिकता आणि बांधिलकी प्रेरणादायी आहे. मी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रिकेट संघटनेच्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो.

दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेल्या टेन डोश्काटेने २००६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अॅम्स्टेलवीन येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५४१ धावा केल्या, तर २४ टी-२० सामन्यांमध्ये ५३३ धावा जोडल्या. २०११च्या विश्वचषकात त्याने इंग्लंडविरुद्ध ११९ आणि आयर्लंडविरुद्ध १०६ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – T20 World Cup : तीन वेळा संधी मिळूनही फलंदाजाला करता आले नाही धावचीत; पहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने शेवटचा वनडे सामना २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध कोलकाता येथे खेळला होता. त्याचवेळी २००८ मध्ये केनियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टी-२० विश्वचषकातील डोश्काटेला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला खाते उघडता आले नाही. नामिबियाविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याने आयपीएलमध्ये २०११ ते २०१५ या काळात कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. कोलकाताने जिंकलेल्या २०१२ व २०१४ आयपीएल विजेतेपदांमध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.