भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट गडद होत चालले आहे. आजपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे, पण पावसामुळे या सामन्याचा नाणेफेकीचा कौलही दुरावला आहे. इतकेच नव्हे, तर पहिले सत्रही पावसामुळे होऊ शकलेले नाही. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी याबाबत आयसीसीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पावसाचा हंगाम असताना आयसीसीला इतका महत्त्वाचा सामना साऊथम्प्टनमध्ये घेण्याची गरज काय?, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेटकरी इतक्यावर न थांबता त्यांनी या सामन्याला विलंब झाल्यामुळे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल केले. पाहा लोकांनी ट्वीटरवर शेअर केलेले मीम्स –

हेही वाचा – WTC FINAL : न्यूझीलंडनं आपली ‘प्लईंग-इलेव्हन’ जाहीर न करण्याचं कारण काय?

 

 

 

 

 

 

 

 

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.