‘ब्लॅक पर्ल’ नावाने ओळखला जाणारा फुटबॉल विश्वातील अवलिया पेले यांचे राजधानी नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत झाले. क्रीडा विश्वातल्या या दिग्गजाला पाहण्यासाठी दिल्लीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. वायू दलातर्फे आयोजित सुब्रतो चषक शालेय स्पर्धेला पेले उपस्थित राहणार आहेत. कोलकाता येथील तीन दिवसीय दौरा आटोपून पेले राजधानीत अवतरले. वायूदल क्रीडा नियंत्रण बोर्डाचे सचिव विजय यादव आणि संचालक सौविक भट्टाचार्य यांनी पेले यांचे स्वागत केले. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या तीन भारतीय क्रीडापटूंचा पेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबरला
सुब्रतो चषकाच्या अंतिम लढतीला पेले उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2015 रोजी प्रकाशित
राजधानीत पेलेंचे जल्लोषात स्वागत
वायू दलातर्फे आयोजित सुब्रतो चषक शालेय स्पर्धेला पेले उपस्थित राहणार आहेत.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 15-10-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New delhi gives a warm welcome to pele