ऑकलंड : नवोदित वेगवान गोलंदाज हेन्री शिपलेच्या (५/३१) भेदक माऱ्याच्या बळावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा १९८ धावांनी धुव्वा उडवला.

ईडन पार्कच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात यजमान न्यूझीलंडने दिलेल्या २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९.५ षटकांत ७६ धावांतच आटोपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेची ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?
IPL 2024 RCB vs LSG Match Updates in Marathi
RCB vs LSG : मयंकच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीचे फलंदाज हतबल, लखनऊने २८ धावांनी नोंदवला दुसरा विजय

आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासूनच ठरावीक अंतराने गडी गमावले. त्यांचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. आपला चौथा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या शिपलेने पथुम निसंका (९), कुसाल मेंडिस (०), चरिथ असलंका (९), कर्णधार दसून शनाका (०) आणि चमिका करुणारत्ने (११) यांना माघारी धाडत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथमच पाच बळी मिळवण्याची किमया साधली.

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर न्यूझीलंडचा डाव ४९.३ षटकांत २७४ धावांवर संपुष्टात आला होता. सलामीवीर फिन अ‍ॅलनने (५१) अर्धशतकी खेळी केली. तसेच पदार्पणवीर रचिन रवींद्र (४९), डॅरेल मिचेल (४७) आणि ग्लेन फिलिप्स (३९) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.