न्यूझीलंडला झिम्बाब्वेने नमवले

विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले.

विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत विश्वचषक उपविजेत्या संघाला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. क्रेग एव्‍‌र्हिनच्या नाबाद १३० धावांच्या झंझावाती खेळाच्या जोरावर झिम्बाब्वेने ३०३ धावांचे अशक्यप्राय आव्हान पार केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड :  ४ बाद ३०३ (केन विलियम्सन ९७, रॉस टेलर ११२, ग्रँट एलिअट ४३; टिनाशे पन्यांगरा २/५०) पराभूत वि. झिम्बाब्वे : ४९ षटकांत ३ बाद ३०४ (हॅमिल्टन मसकाड्झा ८४, चमू चिभाभा ४२,  क्रेग एव्‍‌र्हिन नाबाद १३०, नॅथन मॅक्युलम ३/६२).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New zealand beat zimbabwe

ताज्या बातम्या