एकीकडे आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु असताना दुसरीकडे क्रिकेट जगतात एका बड्या क्रिकेटरने निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर रॉस टेलरचा आजचा नेदरलंडविरुद्धचा शेवटचा सामना होता. या अखेरच्या समान्यात रॉस टेलर मैदानात उतरल्यावर भावूक झाला. क्रिकेटर म्हणून हा शेवटचा सामना असल्यामुळे न्यूझीलंडचे राष्ट्रगीत सुरु झाल्यावर टेलरच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आलाय.

हेही वाचा >>> जाडेजा शून्यावर झाला बाद, चेन्नईच्या कर्णधाराने स्टंपवर काढला राग, भर मैदानात नेमकं काय केलं ?

आज न्यूझीलंड आणि नेदरलंड यांच्यात हेमिल्टनमध्ये सामना खेळवला गेला. रॉस टेलरचा हा अखेरचा सामना होता. सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या देशाचे राष्ट्रगीत झाले. यावेळी न्यूझीलंडचे राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर सर्व खेळाडू रांगेत उभे राहिले होते. रॉस टेलर त्याच्या मुलांसबोत उभा होता. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर टेलर भावूक झाला. हा आपला शेवटचा सामना असल्यामुळे टेलरच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

हेही वाचा >>> तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रॉस टेलरने २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतपार्यंत ११२ कसोटी तर २३५ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. त्याने कसोटी सामन्यांमध्ये ७६८३ धावा केलेल्या असून यामध्ये १९ शतके तर ३५ अर्धशतकांचा सामवेश आहे. तर टेलरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ८५९३ धावा केलेल्या असून २१ शतके आणि ५१ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.