निदहास चषक तिरंगी मालिकेत भारताने बांगलादेशवर ४ गडी राखून मात करत विजय संपादन केला. बांगलादेशने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करताना एका क्षणासाठी भारताची अवस्था बिकट झाली होती. मात्र दिनेश कार्तिकने वादळी खेळी करत एका क्षणात विजयाचं पारडं भारताच्या बाजूने फिरवलं. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना कार्तिकने षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – जाणून घ्या दिनेश कार्तिक सामन्याआधी काय म्हणाला होता…

अखेरच्या षटकात सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर विजय शंकर बाद झाल्यानंतर कार्तिकने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. बाद होण्याआधी शंकरने सरकारच्या गोलंदाजीवर चौकार लगावला होता, त्यामुळे अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ५ धावांची गरज होती. यावेळी भारत हा सामना गमावणार असं वाटत असतानाच कार्तिकने एक्स्टा कव्हरच्या दिशेने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – ….म्हणून रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा तो षटकार पाहिलाच नाही!

कार्तिकच्या या विजयानंतर सर्व भारतीय खेळाडूंनी मैदानावर येत एकच जल्लोष केला. अखेरच्या चेंडूवर विजयाची संधी गमावल्यामुळे बांगलादेशच्या गोटात निराशेचं वातावरण पसरलेलं होतं. मात्र अवघ्या काही क्षणांमध्येच सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी मिम्सच्या माध्यमातून भारताचा विजयोत्सव साजरा करत बांगलादेशी संघाची चांगलीच टर उडवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – India vs Bangladesh T20 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताने मिळवला विजय