Nitin Menon trolled by Virat fans after declaring Steve Smith not out: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत ॲशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. हा मालिकेतील शेवटचा सामना असून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जबरदस्त खेळ करताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २९५ धावांवर आटोपला असून ऑस्ट्रेलियाने १२ धावांची आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ चर्चेचा विषय ठरला तो स्टीव्ह स्मिथमुळे. कारण अंपायर नितीन मेननने स्टीव्ह स्मिथला नाबाद घोषित केले.

त्यानंतर नितीन मेननच्या या निर्णयाचे काहींनी कौतुक केले, तर काहींनी टीका केली. त्याचबरोबर काही चाहते म्हणत आहेत की, नितीन मेनन विराट कोहली वगळता सर्वांशी मैत्री जपतो. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ७८व्या षटकात स्टीव्ह स्मिथने ख्रिस वोक्सने टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. पण बदली क्षेत्ररक्षक जॉर्ज इलहॅमने चेंडू उचलला आणि थेट यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या दिशेने फेकला. जॉनी बेअरस्टोने चेंडू पकडला आणि बेल्स पाडल्या.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत

स्टीव्ह स्मिथ धाव घेण्यात अपयशी ठरल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. इंग्लंडचा संघ आनंदी दिसत होता आणि स्टीव्ह स्मिथनेही आपण धावबाद झाल्याचे मान्य केले होते आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता. पण पंच नितीन मेनन यांनी स्टीव्ह स्मिथला नाबाद घोषित केले. नितीन मेनन यांच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर काही चाहते नितीन मेननच्या या निर्णयाचे कौतुक करताना दिसले. त्याचबरोबर काही चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

त्याचवेळी काही चाहत्यांनी नितीन मेननबद्दल नाराजीही व्यक्त केली. कारण मैदानावर नितीन मेननने अनेकदा विराट कोहलीला अशा प्रकरणांमध्ये आउट घोषित केले आहे. विराट कोहली वगळता क्रिकेटविश्वातील प्रत्येक खेळाडूशी नितीन मेननचे वेगळे नाते असल्याचे सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे. याबाबत अनेक ट्विट करण्यात आली आहेत.

हेही वाचा – MLC 2023: एमआय न्यूयॉर्क जिंकताच किरॉन पोलार्डने उडवली खिल्ली, ड्वेन ब्राव्हो झाला नतमस्तक, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २९५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपताच अंपायरनेही दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १२ धावांची आघाडी घेतली आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने एका विकेटवर ६१ धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. गुरुवारीच डेव्हिड वॉर्नर २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

यानंतर मार्नस लबुशेनने उस्मान ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ८२ चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. यानंतर ख्वाजाचे अर्धशतक हुकले. तो १५७ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला. ट्रॅव्हिस हेड चार आणि मिचेल मार्श १६ धावा करून बाद झाले. अॅलेक्स कॅरी (१०) आणि मिचेल स्टार्क (७) यांनाही विशेष काही करता आले नाही.