वानखेडे मैदानाला कोणताही धोका नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका !

मुंबईच्या वानखेडे मैदानाला कोणत्याही प्रकारे धोका नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे. मध्यंतरी आयपीएल सामन्यांदरम्यान वानखेडे मैदानावर अतिरेकी हल्ला होऊ शकतो अशा बातम्या फिरत होत्या. मात्र या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांचे प्रवक्ते, पोलिस उप-अधिक्षक मंजुनाथ शिंगे यांनी दिलं आहे.

“वानखेडे मैदानाला धोका असल्याची कोणतीही माहिती मुंबई पोलिसांकडे नाहीये. प्रत्येक वेळी सामन्यादरम्यान पोलिस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कठोर उपाययोजना आजमावत असतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडीयावरुन पसरवण्यात येणाऱ्या तथ्यहीन बातम्यांवर विश्वास ठेवू नये.” शिंगे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर मात केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No security threat to wankhede stadium says mumbai police