Steve Smith on Novak Djokovic: ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ पुरुषांचा ड्रॉ निश्चित झाला आहे. या स्पर्धेसाठी प्रबळ दावेदारांमध्ये नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ यांचा समावेश आहे. मात्र, मेलबर्न येथे होणाऱ्या या स्पर्धेत २४ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविच अव्वल स्थानावर आहे. जोकोविचने आपल्या कारकिर्दीत एकूण १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान, जोकोविच आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ नोवाक जोकोविचबरोबर कोर्टवर टेनिस खेळताना दिसत आहे. याशिवाय जोकोविचचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया ओपन २०२४ मध्ये क्रिकेट आणि टेनिस एकाच मैदानावर खेळले गेले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि टेनिस दिग्गज नोवाक जोकोविच एकाच मैदानावर क्रिकेट आणि टेनिस खेळले. स्टीव्ह स्मिथ आणि नोव्हाक जोकोविच टेनिस कोर्टवर फलंदाजी करताना दिसले. याशिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टेनिसही खेळला आहे.

स्मिथने क्रिकेट सोडले नसून तो ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरू होत असल्याने सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी जोकोविचबरोबर टेनिस खेळला. त्याचबरोबर जोकोविचने देखील क्रिकेटचे काही शॉटस खेळले आहेत. जोकोविच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूबरोबर टेनिस खेळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्मिथचे टेनिस कौशल्य पाहून जोकोविच आश्चर्यचकित झाला. याशिवाय आणखी एका व्हिडीओमध्ये टेनिस दिग्गज स्टीव्ह स्मिथ गोलंदाजी करताना दिसला. स्मिथने जोरदार फटकेबाजी करत जोकोविचचा चेंडू स्टँडवर उपस्थित प्रेक्षकांकडे धाडला. जोकोविचने स्मिथकडे दोन-तीन चेंडू टाकले.

जोकोविच तीन स्टंपसमोर बॅट घेऊन आला आणि तो पहिला चेंडू हुकला, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर, दुसऱ्या चेंडूआधी जोकोविचने त्याचे टेनिस रॅकेट उचलले आणि चेंडू फेकल्यानंतर बॅटऐवजी त्याने रॅकेटने शॉट मारला. जोकोविचच्या शॉटने चेंडू स्टँडमध्ये गेला, तिथे असलेल्या प्रेक्षकांना हे पाहून खूप आनंद झाला.

अँडी मरेशी होणार सामना

सर्बियाचा टेनिस स्टार जोकोविच क्वालिफायरविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करेल, पण तिसऱ्या फेरीतच त्याला कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. बिगरमानांकित गेल मॉनफिल्स आणि अँडी मरे हे नोव्हाक जोकोविच सारख्याच लीगमध्ये आहेत.

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: यशस्वी की शुबमन? पहिल्या टी-२० मध्ये रोहित शर्माबरोबर कोण सलामीला येणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मिथने पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिकेत स्मिथ ऑस्ट्रेलियाचा भाग होता. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा स्मिथ पाचव्या क्रमांकावर होता. स्मिथने तीन सामन्यांच्या सहा डावात ३८.८०च्या सरासरीने १९४ धावा केल्या होत्या. या कालावधीत ऑस्ट्रेलियन खेळाडूने एक अर्धशतक झळकावले होते.