Ollie Pope and Rahul Dravid react to playing sweep and reverse sweep short : भारत आणि इंग्लंड संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतालाइंग्लंडविरुद्धच २८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी ५० रिव्हर्स स्वीप फटके मारले, ज्यामध्ये १४ चौकारांचा समावेश होता. त्यामुळे भारतीय संघाला मालिकेत पुनरामगन करायचे असेल, तर त्यांना इंग्लंडच्या फलंदाजांचे रिव्हर्स स्वीप फटके रोखावे लागतील. हे करण्यासाठी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसारख्या फटक्यांसाठी उपाय शोधावा लागेल.

पहिल्या कसोटीत इंग्लंडला २८ धावांनी नेत्रदीपक विजय मिळवून देण्यासाठी ऑली पोपने १९६ धावांची संस्मरणीय खेळी साकारली. या खेळीनंतर ऑली पोपने रविवारी सांगितले की, येथे पोहोचण्यापूर्वी मी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा मोठ्या प्रमाणावर सराव केला आहे. भारतात येण्यापूर्वी अबुधाबीमध्ये इंग्लंड संघाचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. उपखंडातील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी संघाने मुख्यतः बंद दारांमागे सराव केला होता.

Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Rashid Khan is 4 wickets away from creating history
IPL 2024 : मुंबईविरुद्ध राशिदला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! गुजरातसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला गोलंदाज
dream to play for india to fulfill father dream says musheer khan
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास! भाऊ सर्फराजच्या पावलावर पाऊल ठेवत देशासाठी खेळण्याचे मुशीरचे ध्येय

भारतीय फिरकीपटू अतिशय कुशल गोलंदाज –

इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयानंतर पोप म्हणाला, ” भारतीय फिरकीपटू अतिशय कुशल गोलंदाज आहेत. क्रॉस-बॅट शॉट्सऐवजी प्रत्येक चेंडू बचावात्मकपणे खेळण्याचा प्रयत्न केल्यास, तुमची बाद होण्याची शक्यता जास्त असते. इथे येण्यापूर्वी आम्ही त्या फटक्यांचा पुरेसा सराव केला आहे. मला वाटते तुम्ही फक्त त्यासाठी कटीबद्ध असले पाहिजे. स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप खेळणे हे बचावात्मक इतकेच सुरक्षित असू शकते. हे गोलंदाजाला कमी आखूड टाकण्यास भाग पाडते.”

हेही वाचा – U19 WC: अंडर १९ विश्वचषकातील ‘सुपर सिक्स’चे वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कोणकोणत्या संघाविरुद्ध होणार?

येथे पोपने फिरकीपटूंविरुद्ध त्याचा आवडता फटका म्हणून रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला. पहिल्या सत्रात बेन डकेटने या स्ट्रोकचा वापर केल्याने त्याला अधिक आत्मविश्वास मिळाला असावा. पण त्याने हे त्याच्या स्वत:च्या शैलीत केले, जरी प्रत्येक वेळी धोका पत्करला. कधी कधी तो तिन्ही यष्टी उघड्या करायचा आणि वळणावर रिव्हर्स-स्वीप मारायचा. क्रिकविझच्या म्हणण्यानुसार, रिव्हर्स स्वीपमुळे इंग्लंडला आतापर्यंत कसोटीत ५७ धावांचा फायदा झाला आहे. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

द्रविड यांनी पोपचे कौतुक केले –

गोलंदाजांची लय खराब करण्यासाठी नियमितपणे रिव्हर्स स्वीप खेळण्याबद्दल द्रविड यांनी पोपचे कौतुक केले. सामन्यानंतर राहुल द्रविड म्हणाले, “हो, विशेषतः रिव्हर्स स्वीप. मला असे वाटते की स्वीप ही अशी गोष्ट आहे जी आपण भूतकाळात लोकांना खेळताना पाहिले आहे. पण इतका वेळ सातत्यपूर्ण आणि इतक्या यशस्वीपणे रिव्हर्स स्वीप खेळण्यात सक्षम असणे हे विलक्षण आहे, पोपला सलाम.”

हेही वाचा – AUS vs WI : सुरक्षा रक्षक ते भेदक गोलंदाज; ऑस्ट्रेलियाला धूळ चारणारा वेस्ट इंडिजचा शामर जोसेफ आहे तरी कोण?

राहुल द्रविड पुढे म्हणाले, “आम्हाला बॅझबॉलशी स्पर्धा करावी लागेल. मी निश्चितपणे त्या पातळीच्या गोलंदाजांविरुद्ध दीर्घकाळ असे स्वीप, रिव्हर्स स्वीप खेळताना पाहिलेले नाही. यापूर्वीही खेळाडूंनी असे प्रयत्न करताना आणि काही विलक्षण खेळी खेळताना आपण पाहिले आहे. पण इतक्या कमी चुका आणि इतक्या यशस्वीपणे फिरकीपटूंविरुद्ध खेळता येणे, मी कदाचित पहिल्यांदाच पाहिले असेल.”