scorecardresearch

Premium

Olympics 2028: ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात विराटचे योगदान? एल.ए. स्पोर्ट्स डायरेक्टरने केले मोठे विधान

Virat Kohli on Olympics 2028: २०२८ ऑलिम्पिकमधील क्रिकेट टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जाईल, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होतील. क्रिकेट व्यतिरिक्त, IOC अध्यक्ष थॉमस बाक यांनी २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये ध्वज फुटबॉल, बेसबॉल/सॉफ्टबॉल, स्क्वॅश, लॅक्रोस यांचा समावेश करण्याची घोषणा केली.

Olympics 2028: Virat's contribution to inclusion of cricket in Olympics L.A. The sports director made a big statement
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली चर्चेत आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Virat Kohli on Olympics 2028: तब्बल१२८ वर्षांनंतर क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सोमवारी आपल्या १४१व्या सत्रात २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये देशातील सर्वात लोकप्रिय खेळाचा समावेश करण्याची अधिकृत घोषणा केली. २०२८ ऑलिम्पिकमधील क्रिकेट टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जाईल, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होतील. क्रिकेट व्यतिरिक्त, आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये ध्वज फुटबॉल, बेसबॉल/सॉफ्टबॉल, स्क्वॅश, लॅक्रोस या खेळांचा समावेश करण्याचीही घोषणा केली आहे.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली चर्चेत आहे. एल.ए २८चे क्रीडा संचालक निकोल कॅम्प्रियानी यांनी कोहलीचे कौतुक केले. इटलीचे माजी ऑलिम्पिक विजेता नेमबाज निकोल कॅम्प्रियानी यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयओसीकडे मागणी करताना कोहलीच्या लोकप्रियतेचा दाखला दिला. एवढेच नाही तर आयओसीच्या अधिकाऱ्यावरील पोस्टमध्ये सुद्धा विराटचा फोटो दिसत आहे.

DY Patil T20 Cup 2024 Updates in marathi
Hardik Pandya : आयपीएलपूर्वी हार्दिक पंड्याचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन, ‘या’ संघाचे करतोय नेतृत्त्व
IPL 2024 Schedule Announced
IPL 2024 : आयपीएलच्या सलामीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनी- विराट कोहली आमनेसामने, २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
U 19 world cup match , Which players of India are especially expected in the final match of the Under 19 World Cup 2024
युवा विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या कोणत्या खेळाडूंकडून विशेष अपेक्षा?

कॅम्प्रियानी काय म्हणाले?

कॅम्प्रियानी म्हणाले की, “जगभरातील अंदाजे २५० कोटी चाहते असलेल्या विश्वातील दुसऱ्या सर्वात लोकप्रिय खेळाचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.” कॅम्प्रियानी म्हणाले की, “माझा मित्र विराट कोहली जगातील तिसरा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याचे सोशल मीडियावर ३४ कोटी फॉलोअर्स आहेत, जे ली ब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी, टायगर वुड्स सारख्या खेळाडूंच्या एकूण फॉलोअर्सपेक्षा जास्त आहेत.”

विरोधात फक्त दोन मते पडली

ऑलिम्पिकमध्ये या पाच खेळांचा समावेश लॉस एंजेलिस २०२८ आयोजन समितीने प्रस्तावित केला होता. आयओसीच्या कार्यकारी मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सोमवारी मतदान घेण्यात आले. ९९ आयओसी सदस्यांपैकी फक्त दोन सदस्यांनी या खेळांच्या समावेशाच्या विरोधात मतदान केले. यापूर्वी १९००साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. जिथे इंग्लंडने फ्रान्सला हरवून सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा: AUS vs SL, World Cup: लाबुशेन-जोश इंग्लिशची शानदार खेळी! ऑस्ट्रेलियाने उघडले विजयाचे खाते, श्रीलंकेचा पाच गडी राखून दारूण पराभव

प्रसारण हक्कांच्या किमती वाढतील

अहवालानुसार, २०२४ पॅरिस ऑलिम्पिकचे प्रसारण हक्क १५८ कोटी रुपयांवर गेले आहेत. क्रिकेटचा समावेश केल्यास २०२८ ऑलिम्पिकचे प्रसारण हक्क १५२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने या खेळासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत. हे न वापरलेल्या जागतिक बाजारपेठेत चांगली कामगिरी करण्याची संधी देईल. या निर्णयामुळे आम्हाला केवळ महत्त्वपूर्ण आर्थिक लाभच मिळणार नाहीत तर आमच्या खेळावरही त्याचा सखोल सकारात्मक परिणाम होईल.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Olympics 2028 virats contribution in including cricket in olympics la sports director said a big thing avw

First published on: 16-10-2023 at 22:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×