पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याच्या दैनंदिन तिकीट विक्रीला बुधवारपासून प्रारंभ झाला.
पुण्यामध्ये १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. या कसोटी सामन्याची ऑनलाइन तिकीट विक्री ११ सप्टेंबरपासून सुरू झाली. या प्रक्रियेत पाच दिवसांची तिकिटे उपलब्ध होती. दैनंदिन तिकिटे पीवायसी हिंदू जिमखाना (भांडारकर रोड) आणि एमसीए स्टेडियम (गहुंजे) तसेच bookmyshow.com या संकेतस्थळावर ऑनलाइन विक्री सुरू असणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ७४१४९२०९५० किंवा ७४१४९२०९५१ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उभय संघातील कसोटी मालिकेला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. नुकताच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत दोन्ही संघांना १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.
प्रत्येक दिवसाच्या तिकीट विक्रीचे दर
साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँड रु. २०००/-; साऊथ अप्पर : रु. ६००/-; साऊथ लोअर : रु. १०००/-; नॉर्थ स्टँड : रु. १०००/-; नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँड : रु. ८००/-; साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँड : रु. ८००/-; ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँड : रु. ४००/-.