‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दक्षिण आफ्रिका सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले. या निर्णयामुळे त्याला १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
२०१३मध्ये ऑस्करने राहत्या घरी प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्याला शिक्षाही सुनावण्यात आली. ही शिक्षा कमी व्हावी, याकरिता ऑस्करने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि गुरुवारी त्यावर निर्णय सुनावण्यात आला. या निर्णयामुळे ‘पॅरोल’वर सुटलेल्या ऑस्करला पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. ऑस्करला दोषी ठरवल्याचे, न्यायाधीश एरिक लीच यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2015 रोजी प्रकाशित
ऑस्कर पिस्टोरियसला दिलासा नाहीच
ऑस्कर पिस्टोरियसला प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दक्षिण आफ्रिका सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले.

First published on: 04-12-2015 at 01:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscar pistorius guilty of murder