Pakistan vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी विश्वचषक २०२३ चा २२ वा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून २८२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघासमोर २८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पाकिस्तान संघाने लक्ष्य जरी २८३ धावांचे दिले असले, तरी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. आजही पाकिस्तान हरला तर उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होईल. या सामन्यात संघाकडून सर्वाधिक धावा कर्णधार बाबर आझमने केल्या. त्याला ४२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नूर अहमदने मोहम्मद नबीच्या हाती झेलबाद केले. बाबरने ९२ चेंडूत ७४ धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटी इफ्तिखार आणि अहमद यांनी आपल्या तुफानी फलंदाजीने पाकिस्तानच्या धावसंख्येत भर घातली.अफगाणिस्तानकडून नूर अहमदने सर्वादिक ३ विकेट्स घेतल्या.

Russia China friendship, India, in new Cold War, usa, Foreign Relations, india Russia realtions, india china relations, india America relation, trade,
रशिया-चीन मैत्री घट्ट होणे भारतासाठी किती चिंताजनक? नवीन शीतयुद्ध विभागणीत भारताचे स्थान काय?
Syed Mustafa Kamal compares Karachi with india
“भारत चंद्रावर पोहोचला, कराचीमध्ये मुलं उघड्या गटारात…”, पाकिस्तानच्या खासदाराने संसदेत व्यक्त केली खंत
ipl 2024 livingstone returns to england
गुडघ्याच्या दुखापतीमुळे लिव्हिंगस्टोन मायदेशी ; बटलर, जॅक्स, टॉपलीही इंग्लंडला परत
Afghanistan Fan Misbehaves With Shaheen Afridi Video Viral
IRE vs PAK 2nd T20I : अफगाणिस्तानच्या चाहत्याने शाहीन आफ्रिदीशी केले गैरवर्तन, VIDEO होतोय व्हायरल
All India Matches in Lahore for ICC Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : पाकिस्तानने जाहीर केले ठिकाण, भारतीय संघाचे सगळे सामने ‘या’ शहरात होणार
Pakistani army soldiers
पाकिस्तानी लष्कराचे सैनिक गव्हाच्या शेतात करतायत तरी काय? ‘या’ VIDEO मुळे होतायत ट्रोल
Modern submarines from China to Pakistan What a challenge for India
पाकिस्तानला चीनकडून आधुनिक पाणबुडी.. भारतासाठी कोणते आव्हान?
Jason Gillespie Gary Kirsten
कर्स्टन, गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक

शेवटच्या षटकामध्ये शादाब आणि इफ्तिखारची दमदार फटकेबाजी –

शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाला २८२ धावांपर्यंत नेले. दोघांनी ४०-४० धावांचे योगदान दिले. सौद शकीलने २५ आणि इमाम उल हकने १७ धावा केल्या. मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी तीन धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

नूर अहमदच्या शानदार गोलंदाजी –

अफगाणिस्तानकडून नूर अहमदने ३ फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक या तिन्ही धोकादायक फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध केवळ २८२ धावाच करता आल्या, नाहीतर ही धावसंख्या ३०० च्या पुढे जाणार होती. याशिवाय मोहम्मद नबी आणि अजमत उल्लाह उमरझाई यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. पाकिस्तानच्या सलामीवीराने संघाला चांगली सुरुवात करून दिली, त्यामुळे ही धावसंख्या होऊ शकली.

हेही वाचा – World Cup 2023: हार्दिक पांड्याच्या पुनरागमनानंतर मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? आकाश चोप्राने दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानसाठी विजय आवश्यक –

अफगाणिस्तान हा सामना जिंकून पाकिस्तानला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तान विजयाची चव चाखण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तान आजचा सामना हरला तर त्याचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होईल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकायचा आहे. आज पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शाहीन आफ्रिदीवर खिळल्या आहेत. शाहीन आज काय चमत्कार करते याकडे सर्वांचे लक्ष असेल.