Gautam Gambhir: गौतम गंभीर आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघात मेंटॉर म्हणून परतला. मेंटॉर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताचा संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. फक्त प्लेऑफमध्येच नाही तर केकेआरचा संघ सर्वाधिक गुणांसह पहिल्या स्थानी आहे. आता या दरम्यानच गौतम गंभीर रवीचंद्रन अश्विनच्या चॅट शो मध्ये पोहोचला होता. या मुलाखतीत गंभीरने अनेक विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक अशी घटना सांगितली, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

गौतम गंभीरने १४ वर्षांखालील स्पर्धेमध्ये आपल्याशी भेदभाव कसा केला गेला हे उघड केले. गंभीर म्हणाला, ‘मी कदाचित १२ किंवा १३ वर्षांचा होतो, जेव्हा मी प्रथमच १४ वर्षांखालील स्पर्धेसाठी खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निवडकर्त्याच्या पाया न पडल्याने माझी निवड झाली नाही. तेव्हापासून मी स्वतःला वचन दिले की मी कधीही कोणाच्या पाया पडणार नाही आणि मी कधीही कोणाला माझ्याही पाया पडू देणार नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा जेव्हा त्याला अपयशाचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख केला जातो. तो म्हणतो, ‘मला आठवते की जेव्हा मी माझ्या कारकिर्दीत अपयशी ठरलो, मग ते अंडर-16, अंडर-19, रणजी ट्रॉफी असो किंवा माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात असो. लोक म्हणायचे की तू श्रीमंत कुटुंबातून आला आहेस, तुला क्रिकेट खेळण्याची गरज नाही. तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत, तू तुझ्या वडिलांच्या व्यवसायातही जाऊ शकतोस. पण मला लोकांच्या याच विचारसरणीला प्रत्युत्तर द्यायचे होते.

हेही वाचा – IPL 2024: रोहित शर्माने अखेरीस सोडले मौन, MIच्या कामगिरीबद्दल झाला व्यक्त; फलंदाजीबाबतही दिले प्रामाणिक उत्तर

याच शोमध्ये गंभीरने KKR चा सहमालक शाहरुख खानसोबतच्या त्याच्या बॉन्डबद्दलही मोकळेपणाने सांगितले. रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर गंभीर म्हणाला, ‘मी हे यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे, मला वाटते की शाहरुख खान मी आतापर्यंत काम केलेला सर्वोत्तम संघमालक आहे. मी आता केकेआरमध्ये परतलो आहे म्हणून नाही. याचे कारण म्हणजे माझ्या कर्णधारपदाच्या सात वर्षात आम्ही ७० सेकंदही क्रिकेटवर बोललो नाही. आपण कल्पना करू शकता?

RCB vs CSK: रिंकूसमोर खलनायक ठरलेला यश दयाल धोनीला मात्र पडला भारी, पाहा २० व्या षटकातील थरार

गौतम गंभीर कर्णधार असताना त्याने केकेआरसाठी २०१२ आणि २०१४ मध्ये आपल्या नेतृत्वाखाली केकेआरला चॅम्पियन बनवले होते. गौतम गंभीरने केवळ आयपीएलमध्येच नाही तर भारतीय क्रिकेटमध्येही मोठे योगदान दिले आहे. २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

Story img Loader