BCCI wants MS Dhoni’s help in persuading Stephen Fleming : एमएस धोनी जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. याशिवाय, त्याला ‘मास्टर माईंड’ देखील म्हणतात. माहीमध्ये मैदानावर आपल्या ‘मास्टर माईंड’ने सामन्याची दिशा बदलण्याची ताकद धोनीमध्ये आहे. धोनीने निवृत्ती घेतली असली तरी भारतीय क्रिकेटला अजूनही त्याच्या मास्टर माईंडची गरज आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआय धोनीची मदत घेत असल्याची बातमी आली आहे.
टी-२० विश्वचषकाला आता जवळपास १० दिवस बाकी आहेत. ‘मेगा इव्हेंट’पूर्वी बीसीसीआय भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. ज्यासाठी स्टीफन फ्लेमिंग आणि गौतम गंभीर सारखी अनेक मोठी नावे पुढे आली आहेत. सध्या राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहे. पण त्याचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. याआधी बीसीसीआयला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची तरी निवड करावी लागेल. फ्लेमिंग हे मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. लहान लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून राहण्यास फ्लेमिंगला सोयीस्कर आहे, पण राष्ट्रीय संघाबरोबर जास्त वेळ जोडले जाणे फ्लेमिंगला मान्य नाही. त्यामुळे बीसीसीआय धोनीची मदत घेऊ शकते.
बीसीसीआय कोच निवडण्यासाठी धोनीची मदत घेणार –
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “फ्लेमिंगने नाही म्हटले नाही, त्यांनी फक्त कराराच्या कालावधीबद्दल चिंता व्यक्त केली आहे, जी असामान्य नाही. राहुल द्रविडही सुरुवातीला उत्सुक नव्हता. पण त्याचे मन वळवण्यात आले. असे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, फ्लेमिंगच्या बाबतीतही असे घडू शकते आणि हे काम एमएस धोनीपेक्षा चांगले कोण करू शकेल. आयपीएल दरम्यान धोनीशी बोललो नाही. तो आता बाहेर असल्याने आपण त्याच्याशी याबद्दल बोलू शकतो. फ्लेमिंग आणि धोनीचे चांगले बॉन्डिंग आहे.”
माही काही महिने वाट पाहणार –
सीएसकेच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “धोनीने सीएसकेमध्ये मध्ये कोणालाही सांगितले नाही की तो निवृत्त होणार आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महिने वाट पाहणार असल्याचे त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले आहे. तसेच आतापर्यंत विकेट्सच्या दरम्यान धावताना त्याला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही आणि हा एक प्लस पॉइंट आहे. त्यामुळे आम्ही धोनीच्या निर्णयाची प्रतीक्षा करू. तो नेहमी संघाचे हित लक्षात ठेवतो, त्यामुळे आता पुढे काय होते ते पाहूया.”
हेही वाचा – IPL 2024 : ‘आरसीबीने पैसा वाया घालवला…’, बंगळुरुच्या विजयानंतर यशच्या वडिलांचा टीकाकारांबद्दल खुलासा
सीएसकेचे सीईओ धोनीबद्दल काय म्हणाले?
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीबाबत माहिती दिली आहे. क्रिकबझशी बोलताना त्यांनी सांगितले की, “एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार की नाही याबाबत धोनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.” सीएसकेच्या सीईओला धोनीच्या पुढे खेळण्याबाबत विचारण्यात आले, त्यावर त्यांनी सांगितले की, “हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धोनीने पुढील हंगामात खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.” अशा परिस्थितीत माही पुढच्या हंगामातही खेळताना दिसणार आहे.