Shaan Masood said Abdullah Shafiq’s stats in the first few Tests better than Virat Kohli : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या बॅकफूटवर आहे. बांगलादेशकडून घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत दारूण पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदने आता असं एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे तो अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अब्दुल्ला शफीकची स्तुती करताना विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य केले.

पाकिस्तान क्रिकेट संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही ३ सामन्यांची कसोटी मालिका ७ ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदने एक मोठं विधान केलं आहे, जे अनेकांना आवडलेलं नाही. वास्तविक, या मालिकेपूर्वी शान मसूद पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता.

शान मसूद विराटबद्दल काय म्हणाला?

यावेळी त्याला कसोटी सलामीवीरांच्या खराब कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता मसूद संतापला. पत्रकाराने विचारले, ‘संघ अजूनही पक्षपातातून बाहेर येऊ शकला नाही का? कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना आम्ही संधी देत ​​आहोत. अब्दुल्ला शफीक असो की सॅम अयुब, एकाच प्रकारचे खेळाडू टी-२० आणि कसोटी खेळत आहेत.’

हेही वाचा – IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर ‘बॅझबॉल’ शैलीत मालिका विजय, ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम

यावर शान मसूद म्हणाला, ‘मी तुमचा आदर करतो पण तुमचा प्रश्न चुकीचा आहे. या वर्षी संघाची कामगिरी चांगली नाही हे मला मान्य आहे. पण कसोटी आणि टी-२० मिक्स करणे योग्य नाही. तुम्ही आकडेवारीबद्दल बोलत आहात. काही दिवसांपूर्वी मी एक आकडेवारी वाचत होतो की पहिल्या १९-२० कसोटींमध्ये २४ वर्षीय शफिकचे रेकॉर्ड विराट कोहलीपेक्षा चांगले आहेत.’

हेही वाचा – MUM vs ROI : देवदत्त पडिक्कलने हवेत उडी मारुन टिपला चित्तथरारक झेल, फलंदाज पृथ्वी शॉही झाला चकित, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट-शफिकची आकडेवारी –

पहिल्या १९ कसोटी सामन्यांतील शफिकचे आकडे कोहलीच्या तुलनेत सरस असतील यात शंका नाही, पण शान मसूदच्या या विधानाने नव्या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या १९ कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीने ३२ डाव खेळले आणि ४०.६२ च्या सरासरीने ११७८ धावा केल्या होत्या, तर शफीकने १९ सामन्यांच्या ३६ डावांमध्ये ४०.३५ च्या सरासरीने १३७२ धावा केल्या होत्या. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शफीकने कोहलीपेक्षा ४ डाव जास्त खेळले आहेत.