Asia Cup 2022 : आशिया चषकात आज पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत हॉंगकॉंगपुढे १९४ धावांचे लक्ष ठेवले आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाने अर्धशतकीय खेळी करत ७८ धावांची खेळी केली. तर हॉंगकॉंगच्या एहसान खाने पाकिस्तानचे दोन गडी बाद केले.

हेही वाचा – Asia Cup 2022 : सुपर ४ सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताच्या डावाची सुरूवात खराब राहिली. पाकिस्तानची धावसंख्या १३ वर असताना कर्मधार बाबर आझम स्वस्तात परतला. त्याने ८ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ९ धावा काढल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फकर झमन यांनी ११६ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद रिझवाने अर्धशतक झळकावत ५७ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. तर फकर झमनने ४१ चेंडूत ५३ धावा केल्या.

दरम्यान, हॉंगकॉंगने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॉंगकॉंगतर्फे ऐजाज खान हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने ३ षटकात सर्वाधिक ४४ धावा दिल्या. तर एहसान खानने ४ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले.

हेही वाचा – Asia Cup 2022 : ड्रेसिंग रुममधून दिलेल्या संदेशाबाबत श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा, म्हणाले, “तो संदेश…”

आजचा सामना साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. हा सामना जिंकून सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न आहे. आज जो संघ जिंकेल, तो सुपर ४ मध्ये दाखल होणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका हे तीन संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत.