केपटाऊन : बिलावल भट्टी आणि अन्वर अली या युवा खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेल्या पाकिस्तानची ७ बाद १३१ अशी अवस्था झाली होती मात्र बिलावल भट्टी आणि अन्वर अलीने आठव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पाकिस्तानचा डाव २१८ धावांत संपुष्टात आला. बिलावलने ३९ तर अन्वरने नाबाद ४३ धावा केल्या. हे माफक लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १९५ धावांत गडगडला. जॅक कॅलिसने ५० धावा केल्या. ३९ धावांसह ३ बळी टिपणाऱ्या बिलावलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
केपटाऊन : बिलावल भट्टी आणि अन्वर अली या युवा खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला.
First published on: 26-11-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan wins against south africa