Naseem Shah Makes World Record In ODI : न्यूझीलंडविरोधात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर जमांने अप्रतिम खेळी करत शतक ठोकलं आणि प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकला. पण या सामन्यात २० वर्षांचा पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहने एक खास विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. नसीमने सामन्यादरम्यान भेदक गोलंदाजी करून १० षटकात २९ धावा देत २ विकेट घेतल्या. नसीमने २ विकेट घेत वनडे क्रिकेट करिअरमध्ये एक मोठा विक्रम केला.

नसीमने त्याच्या वनडे करिअरच्याआधी ६ सामन्यात २० विकेट घेतल्या आहेत. पहिल्या सहा वनडे सामन्यात सर्वात जास्त विकेट घेण्याचा पराक्रम नसीमने केला आहे. नसीमने मॅट हेनरीचा विक्रम मोडला आहे. हेनरीने त्याच्या वनडे करिअरमध्ये पहिल्या सहा सामन्यात १९ विकेट घेतल्या होत्या. तर बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमानने पहिल्या सहा वनडे सामन्यात १८ विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

नक्की वाचा – अक्षर पटेलला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवण्यात आलं? डेविड वॉर्नरने केला खुलासा, म्हणाला…

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ विकेट्स गमावत २८८ धावा केल्या होत्या. यामध्ये डेरिल मिशेलनं ११३ धावांची शतकी खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाहला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. हारिस रौफलाही दोन विकेट घेण्यात यशं आलं. नसीम शाहने १० षटकात फक्त २९ धावा देत २ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. पाकिस्तानच्या इतर गोलंदाजांची न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली.