Pakistan Playing XI announced for match against India: आशिया चषक स्पर्धेत शनिवारी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशांचे चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र, सामन्याच्या सुमारे १९ तास आधी पाकिस्तानने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारताविरुद्धच्या मोठ्या सामन्यासाठी त्यांनी लवकर प्लेइंग इलेव्हनची घोषणा करुन टीम इंडियाला आव्हान दिले आहे. शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी २.३० वाजता होईल. भारताने अद्याप प्लेइंगइलेव्हनची घोषणा केलेली नाही. रोहित शर्मा अँड कंपनी टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करेल.

नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी निवडलेल्या संघात पाकिस्तानने कोणताही बदल केलेला नाही. तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने तीन फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे. याशिवाय संघाची फलंदाजीही जोरदार दिसत आहे. फखर जमान आणि इमाम-उल-हक सलामीला दिसणार आहेत. त्याचबरोबर बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, सलमान आगा हे मधल्या फळीत दिसणार आहेत. शादाब खान आणि मोहम्मद नवाज हेही खालच्या फळीत फलंदाजी करू शकतात. नसीम व्यतिरिक्त शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ वेगवान आक्रमणात दिसणार आहेत.

भारत सहा वर्षांपासून एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानकडून हरलेला नाही –

सहा वर्षांपासून भारत एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरलेला नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत त्यांचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर भारताने आशिया कप २०१८ मध्ये आणि एकदा विश्वचषक २०१९ मध्ये पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. गेल्या १० सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर भारताने सात सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या एकदिवसीय आशिया चषकात भारताला पाकिस्तानकडून शेवटचा पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा – Asia Cup 2023: भारत-पाक सामन्यापूर्वी विराट कोहली आणि हरिस रौफने घेतली एकमेकांची भेट, VIDEO होतोय व्हायरल

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान १३ वेळा आलेत आमनेसामने –

एकदिवसीय आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान १३ वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यावर किंचित आघाडी कायम ठेवली आहे. १३ पैकी सात सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १३२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. भारताने केवळ ५५ सामने जिंकले आहेत. चार सामन्यांचा निकाल लागला नाही.

हेही वाचा – IND vs PAK: पावसाने व्यत्यय आणल्यास किती षटकांचा खेळ होणे आवश्यक? DLS नियम कधी लागू होणार, जाणून घ्या सर्व काही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.