मोठी बातमी..! ऑस्ट्रेलियाला मिळाला ‘नवा’ कप्तान; स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद!

एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत टिम पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

Pat cummins becomes the first pacer to captain australias mens test team full time
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार

जगातील अव्वल कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ६५ वर्षात पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कमिन्सने टिम पेनची जागा घेतली आहे.

एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका होणार आहे.

हेही वाचा – IND vs NZ : कसोटी पदार्पणात श्रेयस अय्यरनं ठोकल्यात नाबाद ७५ धावा, तरीही लक्ष्मणला वाटतेय ‘ही’ भीती!

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, ६९ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कमिन्स कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. १९५६ मध्ये रेमंड लिंडवॉल यांनी भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.

रे लिंडवॉल हे स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज होते. त्यांनी ६१ कसोटी सामन्यात २२८ विकेट्स घेतल्या आहेत. लिंडवॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारे शेवटचे वेगवान गोलंदाज होते. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला ही संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियात डेनिस लिलीपासून ग्लेन मॅकग्रापर्यंत उत्कृष्ट गोलंदाज होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pat cummins becomes the first pacer to captain australias mens test team full time adn