Pakistan Cricket and World Cup: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर सलग चार सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर अलीकडेच संघातील एका वरिष्ठ खेळाडूने मोठा खुलासा केला आहे. त्याने २०२३चा विश्वचषक पाकिस्तानने जिंकावा असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला वाटत नसल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या एका वरिष्ठ खेळाडूने क्रिकबझशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्याने पीसीबीवर आरोप करताना म्हटले आहे की, “पीसीबीला विश्वचषक जिंकताना संघाला पाहायचे नाही. संघ अपयशी व्हावा अशीच बोर्डाची इच्छा आहे. आम्ही विश्वचषक जिंकावा असे त्यांना वाटत नाही, त्यामुळे ते संघात कोणतेही बदल करू शकतात. संघाचे नेतृत्व कोण करेल आणि टीमवर नियंत्रण कोण ठेवू शकेल, असा व्यक्ती ते शोधत आहेत.” या खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर क्रिकबझला सांगितले.

हेही वाचा: World Cup 2023: टीम इंडिया मुंबईत पोहोचताच रोहित शर्माची चिंता वाढली, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

पाकिस्तानचा हा वरिष्ठ खेळाडू पुढे म्हणाला की, “पीसीबी प्रत्येकाला दोष देत आहेत. हरकत नाही, ही जगाची रीत आहे. मला माहित आहे की, आम्ही किती प्रयत्न केले आहेत. कोचिंग स्टाफनेही आमच्यावर खूप मेहनत घेतली आहे. खेळाडू आणि कर्मचारी यांनी पूर्ण १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे, हे त्यांनी पाहिले तर ते आश्चर्यचकित होतील. मात्र, पीसीबीला आम्ही विश्वचषक जिंकावा असे वाटत नाही.”

विश्वचषकातील पाकिस्तानच्या मोहिमेबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने श्रीलंका आणि नेदरलँड्सविरुद्धच्या ६ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. यानंतर पाकिस्तानला सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

उल्लेखनीय बाब अशी आहे की, “आयसीसी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघ आयसीसी वन डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. पण विश्वचषकात संघाची कामगिरी नेमकी उलटी झाली आहे. अलीकडेच पाकिस्तानला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्येही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.”

हेही वाचा: PAK vs BAN: शाहीन आफ्रिदी- मोहम्मद वसीमची भेदक गोलंदाजी! बांगलादेशने पाकिस्तानसमोर ठेवले २०४ धावांचे माफक आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेश २०४ धावांवर सर्वबाद झाला

मोहम्मद वसीम ज्युनियरने ४६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानला क्लीन बोल्ड केले. रहमानने तीन धावा केल्या. शरीफुल इस्लाम एक धाव घेत नाबाद राहिला. बांगलादेशचा संघ ४५.१ षटकात केवळ २०४ धावा करू शकला. त्याच्यासाठी महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५६ धावांची खेळी खेळली. लिटन दास ४५ धावा केल्यानंतर, कर्णधार शाकिब-अल-हसन ४३ धावा करून आणि मेहदी हसन मिराज २५ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. हारिस रौफला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.