पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी करणार पुन्हा चर्चेत आला आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याची पाकिस्तान राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे घोषणा केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत घोषणा करताना, संपूर्ण पॅनलच्या नावाची घोषणा केली आहे. या पॅनलमध्ये माजी गोलंदाज अब्दुल रज्जाकचाही समावेश करण्यात आला आहे. अधिकृत माहिती देताना बोर्डाने लिहिले, ”पीसीबी व्यवस्थापन समितीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची, पाकिस्तान राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या पॅनेलमध्ये अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम यांचा समावेश आहे. हारुण रशीद हे निमंत्रक असतील.”

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार

नजम सेठी यांच्या अध्यक्षतेखालील पीसीबी व्यवस्थापन समितीने, पाकिस्तानचे माजी मुख्य निवडकर्ता वसीमचा करार संपुष्टात आणल्यानंतर, आफ्रिदीची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९ पर्यंत घटनेने स्थापन केलेल्या सर्व समित्याही विसर्जित करण्यात आल्या आहेत.

नियुक्तीबद्दल बोलताना आफ्रिदी म्हणाला, “पीसीबी व्यवस्थापन समितीने ही जबाबदारी सोपवल्याचा मला सन्मान वाटतो. ही जबाबदारी माझ्या क्षमतेनुसार पार पाडण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही.”

हेही वाचा – IPL Auction 2023: महागडा खेळाडू ठरल्यानंतर हॅरी ब्रूकची आली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बोली लागताच, आई आणि आजी…’

तो पुढे म्हणाला, “आम्हाला आमच्या विजयाच्या मार्गावर परत जाण्याची गरज आहे. मला यात शंका नाही की गुणवत्तापूर्ण आणि धोरणात्मक निवड निर्णयांमुळे आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करू शकू. राष्ट्रीय संघाला आमच्या चाहत्यांचा विश्वास परत मिळवण्यास मदत करेन. मी लवकरच मीटिंग घेईन. मी निवडकर्त्यांची बैठक घेईन आणि आगामी सामन्यांसाठी माझ्या योजना सांगेन.”

शाहिद आफ्रिदी सध्या त्याच्या मुलीच्या लग्नाची तयारी करत आहे. एका पाकिस्तानी वेबसाइटनुसार, लग्न फेब्रुवारीमध्ये होणार असल्याची पुष्टी कुटुंबातील एका सदस्याने दिली आहे. शाहीद आफ्रिदीची मुलगी क्रिकेटर शाहीन आफ्रिदीसोबत लग्न करणार आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. दोघांच्या नात्याला खूप दिवस झाले होते, पण अजून लग्न झालेले नाही.