ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिली ह्युजेस याला शेफील्ड शिल्ड स्पर्धेत फलंदाजीदरम्यान डोक्याला चेंडु लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सिडनीतील स्टेडियमवर सुरू असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्स या दोन्ही संघातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा ह्युजेस याला न्यू साउथ वेल्सचा गोलंदाज सीन ऍबॉट याने टाकलेला उसळता चेंडू थेट डोक्याला लागला. तेथून त्याला थेट सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते आहे. ह्युजेसला दुखापत झाल्यानंतर खेळ तेथेच थांबविण्यात आला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क दुखापतीने त्रस्त असून, त्याची भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याच्याजागी ह्युजेसची वर्णी लागण्याची दाट शक्यता होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2014 रोजी प्रकाशित
डोक्याला चेंडू लागल्याने ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युजेस गंभीर जखमी
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिली ह्युजेस याला शेफील्ड शिल्ड स्पर्धेत फलंदाजीदरम्यान डोक्याला चेंडु लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
First published on: 25-11-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phil hughes struck on head during sheffield game in critical condition