ब्राझील पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष दुहेरीत प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी सुवर्णपदर पटकावले. सोमवारी या दोघांनीही सुवर्ण कामगिरी करून क्रीडाविश्वात नावलौकीक मिळवलं आहे. प्रमोदने एकेरीत रौप्यपदक तर सुकांतने कास्यंपदक जिंकलं आहे. पुरेष दुहेरित या दोन्ही खेळाडूंनी जू डोंगजे व शिन क्युंग ह्यान या कोरिय जोडीला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर भारताच्या या जोडीने सरळ स्टेटमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने २२-२० व २९-१९ असे गुण मिळवून बाजी मारली.

नक्की वाचा – विराट कोहलीला दणका! BCCI ने ठोठावला दंड, ‘या’ खेळाडूंनाही भरावा लागला लाखोंचा भुर्दंड, पाहा लिस्ट

सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रमोद भगतने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, माझ्या कामगिरीचा मला आनंद आहे. पण तरीही त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. एकेरीत मी भाग्यवान ठरलो नाही. नितेशने चमकदार कामगिरी केल्यामुळं त्याचं मी अभिनंदन करतो. दुसरीकडे सुकांतने एकेरीत SL4 कॅटेगरीत ब्रॉंझ मेडल जिंकलं आहे. याविषयी बोलताना सुकांत म्हणाला, मला माझ्या कामगिरीबद्दल आनंद आहे. पण एकेरीत मला खूप जास्त मेहनीत घेण्याची गरज आहे. या स्पर्धेत माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत, याचा मी शोध घेतला आहे. त्या चूका सुधारण्याकडे मला जास्त लक्ष द्यावे लागेल. चूका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.