भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित, अजय जयराम आणि आनंद पवार यांनी पुरुष एकेरीत आरामात विजय मिळवून ५० हजार अमेरिकन डॉलर पारितोषिक रकमेच्या कॅनडा खुल्या ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पध्रेची दुसरी फेरी गाठली आहे.
अमेरिकन खुल्या ग्रां.प्रि. गोल्ड स्पध्रेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या १०व्या मानांकित साईप्रणितने स्कॉटलंडच्या अॅलिस्टर कॅसेचा २१-११, २१-१७ अशा फरकाने पराभव केला. नवव्या मानांकित जयरामने चायनीज तैपेईच्या शि कुई च्यूनला २१-१०, २१-१९ असे पराभूत केले, तर मुंबईच्या आनंद पवारने अमेरिकेच्या निकोलस वॉलरला २१-९, २१-१० अशी धूळ चारली. आरएमव्ही गुरुसाईदत्तला मात्र पराभवाचा धक्का बसला. चीनच्या शि युकीने त्याचा २१-९, २१-१४ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2015 रोजी प्रकाशित
साईप्रणित, जयराम, पवार दुसऱ्या फेरीत
भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित, अजय जयराम आणि आनंद पवार यांनी पुरुष एकेरीत आरामात विजय मिळवून ५० हजार अमेरिकन डॉलर पारितोषिक रकमेच्या कॅनडा खुल्या ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पध्रेची दुसरी फेरी गाठली आहे.

First published on: 25-06-2015 at 05:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praneeth jayaram pawar reaches second round of canada open