मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला पुन्हा एकदा दुखापतीमुळे आपलं स्थान गमवावं लागलं आहे. भारत अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पृथ्वी शॉला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. पृथ्वी शॉच्या जागेवर महाराष्ट्राचा आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाडला भारत अ संघात स्थान देण्यात आलं आहे. ११ जुलै पासून भारत अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
वन-डे मालिकेसाठी सुधारित भारत अ संघ –
मनिष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पांड्या, दिपक चहर, खलिल अहमद, आवेश खान, नवदीप सैनी.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.