प्रो कबड्डी लीगमधील सोमवारच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने दिल्ली दबंग संघाचा पराभव केला. बंगालने दिल्लीवर ३१-२३ अशा फरकाने मात केली. कालच्या सामन्यात बंगालला शेवटच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे बंगळुरू बुल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला होता. मात्र, आज बंगालच्या संघाने त्या चुका टाळल्या. मध्यंतरापर्यंत दिल्लीकडे १४-१३ अशी एका गुणाची आघाडी होती. मात्र, दुसऱ्या सत्रात वेगवान खेळ करत बंगालने दिल्लीचा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league bengal warriors beat dabang delhi 31
First published on: 27-06-2016 at 22:01 IST