घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दबंग दिल्लीचा निराशाजनक खेळ सलग तिसऱ्या दिवशीही सुरु राहिला आहे. हरियाणा स्टिलर्सने यजमान दबंग दिल्ली संघाला ४२-२४ अशी मात करत आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. दबंग दिल्लीच्या एकाही खेळाडूने आज हरियाणाच्या खेळाडूंना टक्कर दिली नाही. त्यामुळे हरियाणाच्या संघाला विजय मिळवणं सोपं होऊन गेलं.

दबंग दिल्लीकडून चढाईत रोहीत बलियान आणि मिराज शेख यांनी आपल्या संघाचं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर खेळाडूंची न मिळालेली साथ यामुळे त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. चढाईत अबुफजल मग्शदुलू, बदली खेळाडू आनंद पाटील यांनीही आज निराशा केली. बचावफळीतल्या एकाही दिग्गज खेळाडूला आज गुण कमावता आले नाहीत. अनुभवी निलेश शिंदेच्या गुणाची पाटी आजही कोरीच राहिली. स्वप्नील शिंदे आणि विराज लांडगे या खेळाडूंनाही फारशी चमक दाखवता आली नाही.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Delhi Capitals vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
GT vs DC : दिल्लीचा IPL मधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: ऋषभ पंतचं रिव्ह्यू न घेणं दिल्ली संघाला पडलं महागात, पाहा सामन्यात नेमकं काय घडलं?
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार? मनोज तिवारीचं मोठं वक्तव्य

हरियाणाने मात्र आजच्या सामन्यात चमकदार खेळाचं प्रदर्श केलं. चढाई आणि बचाव या दोन्ही क्षेत्रात हरियाणाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ केला. प्रशांत कुमार राय, दीपक दहिया, वझीर सिंह यांनी आपापल्या पद्धतीने खेळ करत गुणांची कमाई केली. बचावफळीत कर्णधार सुरिंदर नाडा, राकेश कुमार, मोहीत छिल्लर यांनी भरघोस गुणांची कमाई करत दिल्लीला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.