Premium

Pro League Hockey प्रो लीग हॉकी: भारताचा ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला धक्का

कर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने प्रो लीग हॉकीमध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला ५-१ असे पराभूत केले.

india hockey team
भारताचा ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला धक्का

लंडन : कर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने प्रो लीग हॉकीमध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला ५-१ असे पराभूत केले. प्रो लीगच्या युरोप दौऱ्यात सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताला विजयी पुनरागमन करण्यात यश आले. भारताचा आज, शनिवारी ग्रेट ब्रिटनशी सामना होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेल्जियमविरुद्ध मध्यरक्षक विवेक सागर प्रसादने भारताला दुसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २० आणि ३०व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताची आघाडी वाढवली. भारताकडून अमित रोहिदास (२९व्या मि.) व दिलप्रीत सिंग (६०व्या मि.) यांनी अन्य दोन गोल केले. बेल्जियमचा एकमेव गोल विल्यम घिसलेनने ४६व्या मिनिटाला केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pro league hockey india shock olympic champions belgium amy