Pakistan Super League 2023: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळली जात आहे. गुरुवारी या स्पर्धेतील पेशावर जाल्मी विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड असा सामना खेळला गेला. हा सामना इस्लामाबाद युनायटेडने ६ विकेट्सने जिंकला. दरम्या न या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाबर आझम हसन अलीला बॅटने मारायला धावत असताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना बाबर आझम फलंदाजी करत असताना घडली. त्यावेळी हसन अली षटक टाकण्यासाठी आला होता. या दरम्यान असे काय केले की बाबर आझम आपल्या बॅटने हसन अलीला मारणार होता. खरे तर, सामन्यादरम्यान बाबर आझमने विरोधी गोलंदाज हसन अलीवर बॅट उगारली आणि धावा घेताना त्याला मारण्यासाठी धावला.

बाबर आझम हसन अलीला मारण्यासाठी धावला –

मात्र, हा सर्व दोघांमधील मस्करीचा होता. त्याचे झाले असे की, हसन अलीच्या चेंडूवर बाबर आझमने शॉट मारला आणि धाव घेण्यासाठी धावला. हसन अली बाबर आझमच्या मार्गात येत होता. यादरम्यान बाबरने त्याची बॅट उचलली आणि त्याला मारण्याचे हातवारे केले. ते पाहून हसन अली कव्हरच्या दिशेने धावला.

बाबर आझमची खेळी व्यर्थ गेली –

या पेशाववर जाल्मी संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इस्लामाबाद युनायटेड संघाने १४.५ षटकांत ४ बाद १५९ धावा करताना मोठा विजय मिळवला. हसन अलीने पेशावर जाल्मी विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ३५ धावा देत ३ बळी घेतले होते. तो सामनावीर म्हणूनही निवडला गेला. बाबरने झल्मीसाठी सर्वाधिक ७५ धावा केल्या, परंतु तो आपल्या संघाला इस्लामाबादला विजय मिळवून देऊ शकला नाही.

हेही वाचा – Harry Brook ने मोडला Vinod Kambli चा विक्रम; १४५ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

या स्पर्धेतील पेशावर जाल्मीचा हा दुसरा पराभव ठरला. या विजयानंतर इस्लामाबाद युनायटेडचा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला. दुसरीकडे, पहिल्या स्थानावर असलेल्या मुलतान सुलतान्सचे पाच सामन्यांतून आठ गुण आहेत. पेशावर जाल्मीचे ४ सामन्यांत ४ गुण आहेत. तो चौथ्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psl 2023 pz vs iu live match babar azam ran with the bat to hit hasan ali vbm
First published on: 25-02-2023 at 10:35 IST