Australia vs South Africa World Cup 2023 Live Match Score in Marathi: दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉक २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या या मोसमातील पहिल्या सामन्यात त्याने आपल्या संघासाठी शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्यातही त्याने आपला हाच फॉर्म कायम ठेवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांगारू गोलंदाजही डी कॉकची लय मोडू शकले नाहीत आणि या संघाविरुद्धही शतक झळकावण्यात त्याला यश आले. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये सलग दोन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. याशिवाय वनडे विश्वचषकाच्या सलग दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावणारा डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी २०११ मध्ये एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाटी असा पराक्रम केला होता.

डी कॉकने एकदिवसीय कारकिर्दीतील झळकावले १९वे शतक –

डी कॉकने या सामन्यात कांगारू संघाविरुद्ध ९० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ८ चौकार मारले आणि पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १९ वे शतक होते, तर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचे हे त्याचे तिसरे वनडे शतक होते. या सामन्यात डी कॉकने १०६ चेंडूत ५ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. त्याला ग्लेन बाद केले.

हेही वाचा – IND vs AFG: विराटसोबत झालेल्या वादावर नवीनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘लोकांनी आणि माध्यमांनी…’

डी कॉकने कर्णधार टेम्बा बावुमासोबत केली शतकी भागीदारी –

या सामन्यात क्विंटन डी कॉकने संघाचा कर्णधार टेंबा बावुमासोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तसेच आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ११८ चेंडूत १०८ धावांची भागीदारी झाली आणि दक्षिण आफ्रिकेसाठी विश्वचषकातील ही तिसरी शतकी भागीदारी ठरली. त्याबरोबर क्विंटन डी कॉक कुमार संगकाराच्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाला.

विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी भागीदारी –

१६० धावा – एबी डिव्हिलियर्स आणि जी स्मिथ, बॅसेटेरे २००७
१५१ धावा – फाफ डू प्लेसिस आणि आर व्हॅन डर डुसेन, मँचेस्टर २०१९
१०८ धावा – टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक, लखनऊ २०२३

हेही वाचा – IND vs AFG: हिटमॅन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा सिक्सर किंग ठरल्यानंतर गेलने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रोहित शर्मा…’

विश्वचषकात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज –

५ – कुमार संगकारा
२ – एबी डिव्हिलियर्स
२- ब्रेंडन टेलर
२ – क्विंटन डी कॉक*

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quinton de kock became the first player to score a century in two consecutive matches aus vs sa in odi world cup 2023 vbm
First published on: 12-10-2023 at 17:21 IST