India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. पण त्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंच्या भेटीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि भारतीय खेळाडूंच्या भेटीचा, तसेच रोहित शर्माचा पाकिकस्तान चाहत्यांबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला होता. आता रोहित शर्मा आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – IND vs Pak सामन्याआधी विराट कोहलीचे मोठे विधान, म्हणाला ‘पाकिस्तानचा बाबर आझम जगातील अव्वल फलंदाज’

रोहित-बाबर आमने-सामने

रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोन्ही संघाच्या सरावानंतर झालेली ही भेट आहे. या भेटीत रोहितने बाबरला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याला बाबरनेही उत्तर दिलं आहे. रोहित म्हणाला, ”भाऊ, तु लवकर लग्न कर” रोहितच्या वक्तव्यानंतर बाबरनेही त्याला उत्तर दिले. तो म्हणाला, ”मी सध्या लग्न करणार नाही”. या व्यतिरिक्त दोन्ही कर्णधार क्रिकेटशिवाय इतरही अनेक मुद्द्यांवर बोलताना दिसत आहेत. दोघांच्या भेटीचा हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेटने ट्वीट केला आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022 : …आणि रोहीत शर्माने पूर्ण केली पाकिस्तानी चाहत्याची ‘ही’ इच्छा; VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितसाठी हा सामना महत्त्वाचा

गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. मात्र, आता टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे. रोहितसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रोहित शर्माला भारतीय संघचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच पाकिस्तानशी भिडणार आहे.