scorecardresearch

IPL: शून्यावर बाद झाल्यावर राजस्थान रॉयल्सच्या मालकाने रॉस टेलरच्या कानाखाली मारलं तेव्हा…

आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात रॉस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघात आहे.

IPL: शून्यावर बाद झाल्यावर राजस्थान रॉयल्सच्या मालकाने रॉस टेलरच्या कानाखाली मारलं तेव्हा…
आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात टेलर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता पण २०११ पासून तो राजस्थान संघाकडून खेळत आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रॉस टेलरने त्याच्या ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ या आत्मचरित्रात आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. २०११ साली आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून एका सामन्यात खेळताना रॉस शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर संघ मालकाने त्याच्या कानाखाली मारली असल्याचा आरोप त्याने केला आहे. गंमतीमध्ये हे कृत्य केले असले तरी असे काही होऊ शकते याबाबत मला विश्वास बसत नसल्याची भावना रॉसने व्यक्त केली आहे.

हेही वाचा- क्रीडा क्षेत्र सुवर्णयुगाच्या उंबरठय़ावर!; राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय पथकाची भेट घेतल्यावर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

प्रेयसी समोर मालकाने मारली चापट

रॉसने या घटनेबद्दल लिहिले आहे की, मोहालीत राजस्थान विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना सुरु होता. पंजाबने राजस्थानसमोर १९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मी शून्य धावसंख्येवर आऊट झालो आणि आम्ही लक्ष्य गाठू शकलो नाही. त्यावेळी संपूर्ण संघ, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापन हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील बारमध्ये होते. सामना संपल्यानंतर हॉटेलच्या वरच्या मजल्यावर संघाचे काही खेळाडू, फ्रँचायझीचे मालक मद्यपान करत होते. वॉर्नी (शेन वॉर्न) त्याची प्रेयसी लिझ हर्लेसोबतही तिथे होती.

गंमतीत मारली होती चापट

राजस्थान रॉयल्सच्या मालकाने मला सलग ३-४ चापट मारली होती आणि आम्ही तुम्हाला ० धावांवर बाद होण्यासाठी लाखो रुपये देऊन विकत घेतले नसल्याचे म्हणले होते. मात्र, हे विनोदी कृत्य असल्याचे रॉसने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- आपल्या आवडत्या मैदानावर युझवेंद्र चहलने पुन्हा दिली ‘ती’ पोझ

आयपीएलचा अनुभव कसा होता

आयपीएलमध्ये खेळण्याच्या अनुभवावर त्याने लिहिले की, जेव्हा तुम्हाला खेळण्यासाठी भरपूर पैसे मिळतात, तेव्हा तुम्ही कामगिरी करण्यास उत्सुक असता. तुम्हाला विकत घेणाऱ्या संघांनाही तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा एक व्यवसायिक खेळाचा भाग असल्याचेही रॉस म्हणाला.

अनेक संघाकडून खेळले सामन

रॉस टेलर आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. २००८ ते २०१० पर्यंत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले. २०११ मध्ये तो राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला होता. यानंतर त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनही काही सामने खेळले आहेत. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघात आहे. रॉसने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ५५ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ३ अर्धशतकांच्या मदतीने १०१७ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील टेलरची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८१ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या