क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोव्याकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने राजस्थानविरुद्ध १२० धावांचे शतक झळकावले. या शतकासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. अर्जुनपूर्वी त्याच्या सचिननेही रणजी पदार्पणात शतक झळकावले होते. दुसरीकडे, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अर्जुनच्या शतकावर मोठे वक्तव्य केले आहे. अर्जुनच्या या खेळीचे दिनेशने कौतुक केले आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पण उत्कृष्ट केले आहे. अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना शतक केले. त्याचे वडील सचिन तेंडुलकरनेही रणजी पदार्पणात शतक झळकावले. अर्जुन तेंडुलकरच्या फलंदाजीने दिनेश कार्तिक चांगलाच प्रभावित झाला आहे. त्याने अर्जुन तेंडुलकरचे कौतुक केले आहे.

दिनेश कार्तिकने अर्जुनचे जोरदार कौतुक केले

क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, “आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी ओळखतो, त्याला फलंदाजीही थोडीफार माहिती आहे. त्याने या क्षेत्रात मेहनत केल्याचे त्याने शतक झळकावून दाखवून दिले आहे. हे शतक त्याच्यासाठी खास आहे. गोलंदाज झाल्यानंतर त्याला हे करता आले आहे. मी त्याला इंग्लंडमध्ये सराव करतानाही पाहिले आहे. त्याच्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.”

हेही वाचा:   IND vs BAN: अ‍ॅलन डोनाल्डने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची मागितली जाहीर माफी! राहुल द्रविडची खास प्रतिक्रिया पाहा video

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “त्याचे खूप खूप अभिनंदन. आपण सहसा अर्जुन तेंडुलकरला फलंदाजीसाठी नाही ओळखला जात कारण तो डावखुरा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना दिसतो. पण त्याची फलंदाजीतील मेहनत पाहून खूप छान वाटले. यावरून तो पुढील काळात भारतासाठी अष्टपैलूची भूमिका पार पाडताना दिसेल,” असे मोठे विधान त्याने केले.

विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध शतक झळकावले. या शतकासह त्याचे प्रथम श्रेणीतील पदार्पण संस्मरणीय ठरले. अर्जुन तेंडुलकरने आपल्या शतकी खेळीत १२० धावा केल्या. त्याच्याशिवाय प्रभुदेसाईनेही शानदार फलंदाजी करताना द्विशतक झळकावले. अर्जुन तेंडुलकरने गोव्यासाठी खेळण्यासाठी मुंबई सोडली आणि तो यशस्वी झाला.

हेही वाचा:   किशोर कुमारांच्या बंगल्यातील रेस्टॉरंटची खास चव अजूनही रेंगाळते तेव्हा… विकास खन्ना सोबत विराटने जागवल्या आठवणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन तेंडुलकरनेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले. १९८८ मध्ये गुजरातविरुद्ध खेळताना त्याने शतक झळकावले होते. हे त्याचे रणजी पदार्पण होते आणि तो मुंबईकडून खेळत होता. तेंडुलकर नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला आणि त्याने महान क्रिकेटपटूंमध्ये स्वतःचा समावेश केला.यापूर्वी अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला आहे. त्याला आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सने त्याचा आयपीएलमध्ये समावेश केला असला तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केलेला नाही. अर्जुनने एकदा एका वक्तव्यात म्हटले होते की, देशासाठी कसोटी खेळण्याचे माझे ध्येय आहे.