Ranji Trophy 2024-25 Live Streaming In Marathi: रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा हंगाम यंदा दोन भागात विभागून आयोजित केला आहे. पहिली फेरी ११ ऑक्टोबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत खेळवली गेली आणि आता दुसरी फेरी २३ जानेवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे. या दुसऱ्या हंगामातील सामने फारच रोमांचक असणार आहेत. यामागील कारण म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उतरणार आहेत.

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत २३ जानेवारी ते २६ जानेवारी आणि त्यानंतर ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत साखळी सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पराभवानंतर फिटनेसच्या समस्या नसल्यास BCCI ने आपल्या सर्व करारबद्ध क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं आहे.

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

स्टार फलंदाज विराट कोहली २०१२ नंतर रणजी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध दिल्लीच्या सामन्यासाठी त्याने स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माही १० वर्षांनंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे. रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघात जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळणार आहे. रोहितशिवाय यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडूदेखील खेळणार आहेत.

हेही वाचा – Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघाची घोषणा, रोहित शर्मा १० वर्षांनी खेळणार; कोण करणार संघाचं नेतृत्त्व?

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही राजकोटमधील सौराष्ट्र संघाच्या सराव सत्रात भाग घेतला आणि २३ जानेवारीपासून दिल्लीविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात तो खेळणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये जडेजा सौराष्ट्रकडून शेवटचा सामना खेळला होता. शुबमन गिल पंजाबकडून तर ऋषभ पंत दिल्लीकडून रणजी सामना खेळणार आहे. गिल २३ जानेवारीला सुरू होणाऱ्या पंजाब वि कर्नाटक सामन्यात खेळताना दिसेल. ऋषभ पंतने २३ जानेवारीपासून राजकोट येथे सुरू होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या आगामी रणजी ट्रॉफी सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध केले आहे.

हेही वाचा –Virat Kohli: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घेतला मोठा निर्णय, कधी होणार सामना

रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट

रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये ३८ संघांची पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. चार एलिट गट आहेत (A, B, C आणि D), प्रत्येक गटात ८ संघ आहेत. त्याच वेळी, उर्वरित ६ संघांना वेगळ्या प्लेट गटात ठेवण्यात आले आहे.

रणजी ट्रॉफी २०२४-२५ चे सामने किती वाजता सुरू होणार?
रणजी ट्रॉफीचे सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतील.

हेही वाचा – Neeraj Chopra-Himani More Love Story: नीरज-हिमानीची फिल्मी लव्हस्टोरी! अमेरिकेत झाली भेट अन्…, गोल्डन बॉयच्या काकांनी सांगितली प्रेमकहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणजी ट्रॉफी २०२४-२५ चे सामने कुठे लाईव्ह पाहता येणार?
रणजी ट्रॉफी २०२४-२५ चे सामने स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या एसडी आणि एचडी चॅनेवर लाईव्ह पाहता येतील. तर या सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.