Ranji Trophy 2025 Virat Kohli eats Chilli Paneer in lunch : विराट कोहलीने याआधी बऱ्याचदा खुलासा केला होता की, त्याला दिल्लीतील विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडते. पण क्रिकेटमुळे तो सर्व काही सोडून वर्षानुवर्षे खास डाएट फॉलो करत आहे. मात्र, जेव्हापासून तो रणजी ट्रॉफी सामन्यासाठी दिल्लीला पोहोचला आहे, तेव्हापासून तो त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. कोहली केवळ जुन्या मित्रांनाच भेटत नाही तर दररोज वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत आहे. रेल्वेविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने लंच ब्रेकमध्ये खास मिरची पनीर ऑर्डर करुन त्याचा आस्वाद घेतला.

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि रेल्वे यांच्यात रणजी ट्रॉफी सामना खेळला जात आहे. दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रात ८७ धावांवर ५ गडी बाद केले. यानंतर लंच ब्रेक झाल्यावर कोहलीने मिरची पनीर खाण्याची इच्छा व्यक्त केली. अरुण जेटली स्टेडियमचे शेफ संजय झा यांनी ही माहिती दिली. त्यांनी कोहलीच्या साधेपणाचे कौतुक केले. त्यांच्या मते, एवढा मोठा आंतरराष्ट्रीय स्टार असूनही कोहलीने सर्वांशी ज्या साधेपणाने वागला ते हृदयस्पर्शी होते.

डीसीए कॅन्टीनच्या मुख्य आचारी काय म्हणाले?

डीडीसीए कॅन्टीनचे मुख्य आचारी संजय झा म्हणाले, ‘विराटने आम्हाला विशेषतः मिरचीचे पनीर बनवायला सांगितले. म्हणूनच आम्ही खास त्याच्यासाठी मिरचीचे पनीर पाठवले आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितले की हे आमचे कॅन्टीन आहे. त्यामुळे आम्ही बाहेरचे अन्न खाणार नाही. पूर्वी चिली चिकन हा त्याचा आवडता पदार्थ होता. त्यावेळी तो आपल्या मित्रांनाही आवर्जून खायला सांगायचा. आता तो छोले भटूरे किंवा कढी भात खातो. मी त्याला बाहेरून काही मागवायचे का, असे विचारले, त्याने आपल्या कॅन्टीनमधलेच खायचे आहे असे सांगून नकार दिला.’

विराट कोहली पूर्वी मांसाहारी होता –

विराट कोहली २०१८ पूर्वी मांसाहारी होता. त्यावेळी चिली चिकन हा त्याचा आवडता पदार्थ होता. पण त्यानंतर तो शाकाहारी झाला. तसेच विराट कोहलीला छोले-भटुरे खूप आवडतात. त्याने याचा उल्लेख अनेक मुलाखतीत केला आहे. जेव्हा तो दिल्ली संघासोबत सराव करायला आला, तेव्हा त्याच्यासाठी ही व्यवस्था आधीच करण्यात आली होती. मात्र कोहलीने ते खाण्यास नकार दिला. त्यानंतर नवदीप सैनी आणि इतर सहकारी खेळाडूंसोबत कढी भात खाल्ला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीत विराट कोहलीची प्रचंड क्रेझ –

विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी आला आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. कोहलीची दिल्लीत बरीच क्रेझ आहे. यासाठी डीडीसीएनेही जबरदस्त व्यवस्था केली आहे. अरुण जेटली स्टेडियममध्ये चाहत्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. चाहत्यांनी स्टेडियममध्ये पोहोचण्यापूर्वी स्टेडियमच्या बाहेर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या होत्या.