वेगवान गोलंदाज लक्षय गर्गच्या भेदक माऱ्यापुढे (६/४६) गोव्याविरुद्धच्या रणजी करंडक लढतीत मुंबईचा पहिला डाव फक्त १६३ धावांत आटोपला. मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला, तर सौराष्ट्रविरुद्ध २७५ धावांची खेळी साकारणाऱ्या सर्फराज खानने (११० चेंडूंत ६३ धावा) एकाकी झुंज दिली.

एलिट ड-गटाच्या लढतीत गोव्याने पहिल्याच दिवशी अनपेक्षित कामगिरी करीत ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईविरुद्धच्या सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. गर्गने कर्णधार पृथ्वी शॉचा (९) अडथळा दूर केल्यानंतर रहाणेला पायचीत केले. त्यानंतर सर्फराज आणि सचिन यांनी चौथ्या गड्यासाठी सर्वाधिक ७५ धावांची भागीदारी रचली. तनुष कोटियन (३०), सचिन यादव (२७) व आकर्षित गोमेल (२१) यांनीसुद्धा महत्त्वाचे योगदान दिले. परंतु ५२.४ षटकांत मुंबईचा डाव आटोपला. गोव्याकडून अमित यादवने ४७ धावांत ४ बळी घेतले.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम

त्यानंतर, गोव्याने पहिल्या डावात २ बाद ११४ अशी दमदार मजल मारली. अमोघ देसाई (खेळत आहे ५१) आणि सुयश प्रभुदेसाई (४०) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

’  मुंबई (पहिला डाव) : ५२.४ षटकांत सर्व बाद १६३ (सर्फराज खान ६३; लक्षय गर्ग ६/४६, अमित यादव ४/४७)

’  गोवा (पहिला डाव) : ३३ षटकांत २ बाद ११४ (अमोघ देसाई खेळत आहे ५१, सुयश प्रभुदेसाई ४०; मोहित अवस्थी १/१४)