Indian cricket team arrives in Guwahati: आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वी शुक्रवारपासून सर्व संघ सराव सामने खेळणार आहेत. शुक्रवारी तीन सराव सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा पहिला सराव सामना शनिवारी (३० सप्टेंबर) इंग्लंडविरुद्ध आहे, त्यासाठी भारतीय संघ गुवाहाटीला पोहोचला आहे. टीम इंडिया गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर एक मोठी माहिती समोर येत आहे की, अक्षर पटेल संघासोबत नसून त्याच्या जागी आर अश्विन दिसत आहे. विश्वचषक संघातील अखेरच्या बदलाचा आज शेवटचा दिवस आहे. अशा स्थितीत आजच टीम इंडियाला अक्षरच्या बदलीची घोषणा करावी लागणार आहे.

अश्विनचा विश्वचषक संघात समावेश –

अक्षर पटेलच्या जागी अद्याप बोर्डाकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु सराव सामन्यासाठी गुवाहाटीला पोहोचलेल्या भारतीय संघासोबत अश्विन असल्याने अक्षर पटेल विश्वचषक संघाचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत होईल असे मानले जात आहे. अश्विनशिवाय वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचाही विश्वचषक संघात अक्षरच्या जागी विचार केला जात होता.

आशिया कपमध्ये अक्षर पटेलला दुखापत –

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच करण्यात आली होती. त्यावेळी अक्षर पटेलची संघात निवड करण्यात आली होती, मात्र आशिया चषकादरम्यान अक्षर दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला आशिया चषकाच्या अंतिम फेरीला मुकावे लागले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही तो खेळू शकला नाही. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन सामने खेळून चांगली गोलंदाजी केली. तसेच शेवटच्या सामन्यात वॉशिंग्टनला संधी देण्यात आली होती.

हेही वाचा – World Cup 2019: टीम इंडियाशी संबंधित फोटोचे ४ वर्षांनंतर उकलले गूढ, ऋषभ पंतच्या खांद्यावर ‘या’ व्यक्तीचा होता हात

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

Story img Loader