Mayank Agarwal talks about Rishabh Pant’s hand on shoulder: भारतीय क्रिकेट संघाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात, परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक फोटो असा आहे, जो ४ वर्षांपासून रहस्य बनून राहिला आहे. आम्ही २०१९ च्या वर्ल्ड कपच्या त्या फोटोबद्दल बोलत आहोत ज्यामध्ये हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल दिसत आहेत. तेव्हापासून हा फोटो व्हायरल होत आहे कारण त्याच्याशी एक रहस्य जोडले गेले आहे.

वास्तविक, या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सर्व खेळाडू एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. एक हात ऋषभ पंतच्या खांद्यावरही ठेवण्यात आला होता, पण तो हात धोनीचा किंवा बुमराहचा नव्हता. यानंतर पंतच्या खांद्यावर कोणाचा हात ठेवला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. या फोटोने अनेक वर्षे चाहत्यांना संभ्रमात ठेवले होते, पण आता हे गुपित उघड झाले आहे. या फोटोमध्ये मागे उभ्या असलेल्या मयंक अग्रवालने हे रहस्य उलगडले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मयंक अग्रवाल म्हणाला, “बऱ्याच वर्षांच्या गहन संशोधन, वादविवाद आणि अगणित षडयंत्रांनंतर, देशाला कळले पाहिजे की ऋषभ पंतच्या खांद्यावर माझा हात आहे. इतर सर्व दावे दिशाभूल करणारे आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही.”

२०१९ मध्ये, हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला होता. त्यानंतर पंतच्या खांद्यावर असलेला गूढ हात पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर या फोटोने सोशल मीडियावर बरीच चर्चा निर्माण केली होती. टीम इंडियाने वर्ल्ड कप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये शानदार एन्ट्री केली होती, तेव्हा हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ॲश्टन अगर स्पर्धेतून बाहेर

यंदाचा विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारत या स्पर्धेतील आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात बदल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Story img Loader