चेन्नई येथे सुरु असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला दिल्लीच्या संघानं विकत घेतलं आहे. दोन कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या स्मिथला २ कोटी २० लाख रुपयात दिल्ली संघानं विकत घेतलं आहे. IPLच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली होती. यात राजस्थान संघानं कर्णधार स्टीव्ह स्मिथ यालाच करारमुक्त करून टाकलं. गेल्या हंगामातील त्याचा खराब फॉर्म ही त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब ठरली. त्यामुळे राजस्थानने अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली होती. यंदा स्मिथला दिल्ली संघानं विकत घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिलावात आरसीबीनं स्मिथवर मूळ किंमतीमध्ये बोली लावली होती मात्र, त्यानंतर दिल्लीनं दोन कोटी २० लाख रुपयांत स्मिथवर बोली लावली. अखेर दिल्लीनं स्मिथला आपल्या संघात घेतलं आहे. यंदाच्या हंगामात स्मिथ दिल्लीच्या संघाकडून खेळणार आहे. स्मिथला राजस्थान संघानं १२ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. पण यंदा स्मिथची किंमत घसरली आहे.

दिल्लीच्या संघाने गेल्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण मोक्याच्या क्षणी त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दिल्लीच्या संघाकडे शिखर धवन, मार्कस स्टॉयनीस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल असे सहा फलंदाज आहेत. परंतु पृथ्वी शॉ च्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या संघात सलामीवीराची जागा एखाद्या अनुभवी खेळाडूला दिली जाऊ शकते. दिल्लीने शेवटच्या सामन्यांमध्ये स्टॉयनीसला सलामीला पाठवलं होतं पण त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत स्टीव्ह स्मिथसारखा अनुभवी फलंदाज ताफ्यात दाखल झाला तर दिल्लीच्या संघाला स्थैर्य देण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb had an opening bid but delhi capitals have entered the bidding and he is sold to delhicapitals nck
First published on: 18-02-2021 at 15:26 IST