Asia Cup 2023, IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघ मजबूत फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आशिया चषकात टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे जिथे फिरकी गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जर फिरकी गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी खूपच चांगली होती. टीम इंडिया या क्षेत्रात मजबूत असून पाकिस्तानविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. २०२२ पासून झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी ५७ विकेट्स घेतले आहेत, दुसरीकडे भारतीय फिरकी गोलंदाजांनी १०० विकेट्स घेतले आहेत.
भारतीय संघ श्रीलंकेतील कॅंडी शहरात पोहोचला आहे. पाकिस्तान संघ शुक्रवारी येथे सामन्यापूर्वी काही तास आधी सराव सत्र घेणार आहे. पहिल्या सामन्यात नेपाळला पराभूत करून पाकिस्तानने स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती पण, आता त्याचा सामना सर्वात मोठ्या संघाशी होत आहे. पाकिस्तानही टीम इंडियाचं घेण्यासाठी सज्ज असून त्यांची वेगवान गोलंदाजी टीम इंडियाला अडचणीत आणू शकते. मात्र, फिरकी गोलंदाजीमध्ये हा आकडा उलट आहे, म्हणजे तो भारताच्या बाजूने आहे. कोणताही संघ आशियातील सामने जिंकण्यासाठी फिरकी गोलंदाजीवर खूप अवलंबून असतो.
भारताच्या जर फिरकी गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर २००२ पासून भारतीय फिरकीपटूंचा दबदबा आहे. भारताने वन डे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत १०० विकेट्स घेतल्या आहेत दुसरीकडे पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी ५७ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघाचे फिरकीपटू केवळ जास्त विकेट्समध्येच नाही तर इकॉनॉमी रेटमध्येही पुढे आहेत. भारतीय फिरकीपटूंचा इकॉनॉमी रेट ५.१ आहे आणि पाकिस्तान या बाबतीतही भारतीय संघाच्या मागे आहे. त्याच्या फिरकी गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट ५.३ आहे.
पाकिस्तान संघात शादाब खान, उसामा मीर, इफ्तिखार अहमद आणि आगा सलमान यांच्या रूपाने ४ फिरकी गोलंदाज आहेत, त्यापैकी इफ्तिखार अहमद आणि शादाब खान प्लेइंग ११चा भाग असू शकतात. भारतीय संघाकडे कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांच्या रूपाने ३ फिरकीपटू आहेत.
भारत-पाकिस्तान गोलंदाजीत कोण आहे सरस?
भारत-पाकिस्तान गोलंदाजीत कोण आहे सरस? असा प्रश्न जेव्हा त्याला स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात विचारला गेला तेव्हा त्याने उत्तर दिले. जडेजा म्हणाला, “आशिया चषकापूर्वी टीम इंडियासाठी हे आकडे अधिक उत्साह वाढवतील. मात्र, त्यादिवशी नेमकं काय होत यावर हे अवलंबून असणार आहे. या विशिष्ट प्रकरणात भारत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. याने आमचा सर्वांचा आत्मविश्वास दुणावला आहे.”
पल्लेकेले स्टेडियमची सद्यस्थिती काय आहे?
शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान गट अ सामन्याच्या आधी, घरचा संघ श्रीलंका त्याच ठिकाणी गुरुवारी बी गटातील सामन्यात बांगलादेशविरुद्ध आशिया चषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पाऊस आणि ओल्या आउटफिल्डमुळे तो सामना थांबवला जाण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस संततधार पाऊस आणि खराब हवामानामुळे मैदान तयार करणे मैदानातील कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे. मात्र, एक चांगली बातमी आहे की सकाळच्या चित्रांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो आहे.