इंग्लंडचा दिग्गज फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सध्या आलबेल नसल्याचे समोर येत आहे. अलीकडेच वॉल्व्हरहॅम्प्टनने ओल्ड ट्रॅफर्ड येथे मँचेस्टर युनायटेडला १-०ने पराभूत केले. त्यामुळे या मैदानावरील त्यांचा विजयीरथ रोखला गेला. ब्रिटीश मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, या क्लबचे १७ स्टार खेळाडू त्यांच्या संघ व्यवस्थापवर नाराज आहेत आणि ते क्लब सोडू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका अहवालानुसार, मँचेस्टर युनायटेड संघातील खेळाडू गटांमध्ये विभागले गेले आहेत. ते क्लबमध्ये खूश नाही. इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलच्या वृत्तानुसार, १७ स्टार खेळाडू पुढील हंगामापूर्वी क्लब सोडू शकतात. ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंमध्ये बंडखोरी होते आणि संघ विभागला जातो.

अहवालानुसार, पॉल पोग्बा, जेसी लिंगार्ड, अँथनी मार्शल, एडिनसन कावानी, डॉनी व्हॅन डी बीक, डीन हेंडरसन, एरिक बेली यांच्यासह अनेक स्टार खेळाडू दुसऱ्या संघाकडून ऑफर येताच क्लब सोडण्यास तयार आहेत. संघाचे मनोबल सध्या कमी आहे. अहवालात असेही म्हटले आहे की संघाचे हंगामी बॉस राल्फ रॅगनिक संघाला एकत्र आणण्याचे काम करत आहेत, परंतु ते तसे करण्यास असमर्थ आहेत.

कराराखाली असलेल्या खेळाडूंना तूर्तास संघ सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही. असे असूनही पुढील आठ महिन्यांत अनेक खेळाडू संघ सोडू शकतात. अँथनी मार्शल या महिन्यात क्लब सोडणार आहे आणि सेव्हिलाला जाण्यास तयार आहे.

हेही वाचा – IND vs SA : विराट शेवटचा कसोटी सामना खेळणार की नाही? द्रविड म्हणतो, ‘‘त्याच्या फिटनेसमध्ये…”

इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल बोलायचे तर क्लबने या हंगामात १९ सामन्यांत ३१ गुण मिळवले आहेत. त्यांनी फक्त नऊ सामने जिंकले आहेत आणि सहामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ते प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांना आपला पुढील सामना १० जानेवारीला अॅस्टन व्हिलाविरुद्ध खेळायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report says 17 star footballers in manchester united likely to quit team adn
First published on: 07-01-2022 at 17:21 IST