Irani Cup 2023 Madhya Pradesh vs Rest of India: मध्य प्रदेश आणि शेष भारत यांच्यातील इराणी चषक कसोटी सामना पार पडला. या सामन्यात शेष भारत संघाने चमकदार कामगिरी करत २३८ धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. सामन्यात शेष भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत मध्य प्रदेशच्या युवा संघाचा पराभव केला. ४३७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्या डावात १९८ धावांत आटोपला.

शेष भारताने ३०व्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने द्विशतक आणि एका शतकासह दोन्ही डावात एकूण ३५७ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मध्य प्रदेश संघाने दिवसाची सुरुवात २ बाद ८१ धावांवरुन केली. प्रथमच इराणी चषक जिंकण्यासाठी त्यांना आणखी ३५६ धावांची गरज होती. पण कालचा नाबाद फलंदाज हिमांशू मंत्री त्याच्या ५१ धावांच्या स्कोअरमध्ये कोणतीही भर न घालता बाद झाला. शेष भारताकडून सौरभ कुमारने तीन तर मुकेश कुमार आणि पुलकित नारंगने प्रत्येकी दोन बळी घेतले.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Action against Samson for slow over rate
IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय

तत्पूर्वी, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असलेल्या यशस्वी जैस्वालने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. त्याने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. पहिल्या डावात २१३ धावा करणाऱ्या जैस्वालने दुसऱ्या डावात १४४ धावांचे योगदान दिले, ज्यामुळे शेष भारताला या डावात २४६ धावा करता आल्या.

हेही वाचा – WPL 2023: आयपीएलप्रमाणेच झाली डब्ल्यूपीएलची सुरुवात; दोन्ही सामन्यातील साम्य पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

शेष भारताने पहिल्या डावात ४८४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेश १९४ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात स्टार फलंदाज जैस्वालने नवा इतिहास रचला. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वीने या सामन्यात एकूण ३५७ धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने १३२ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १४४ धावा केल्या. तत्पूर्वी, पहिल्या डावातही २५९ चेंडूत ३० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २१३ धावांची शानदार खेळी केली होती.

मध्य प्रदेशचा संघ: हिमांशू मंत्री (कर्णधार), अरहम अकिल, शुभम एस शर्मा, हर्ष गवळी, यश दुबे, अमन सोलंकी, सरांश जैन, अनुभव अग्रवाल, अंकित कुशवाह, कुमार कार्तिकेय, आवेश खान

हेही वाचा – WPL 2023: आयपीएलप्रमाणेच झाली डब्ल्यूपीएलची सुरुवात; दोन्ही सामन्यातील साम्य पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

शेष भारताचा संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, यशस्वी जैस्वाल, बाबा इंद्रजीत, यश धुल, उपेंद्र यादव, सौरभ कुमार, अतिथ शेठ, पुलकित नारंग, नवदीप सैनी, मुकेश कुमार