दक्षिण आफ्रिकेत २००३ साली पार पडलेल्या वन-डे विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय क्रिकेट प्रेमी विसरणार नाही. अंतिम फेरीत रिकी पाँटींगच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावलं होतं. रिकी पाँटीगने अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करत चौफेर फटकेबाजी केली होती. अपेक्षेप्रमाणे भारताला हे आव्हान पेलवता आलं नाही. मात्र या अंतिम सामन्यानंतर अनेक अफवांना पेव फुटलं होतं. या सर्व अफवांमध्ये रिकी पाँटीगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती आणि त्यामुळेच चेंडू इतक्या लांब जात होता अशी चर्चा सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिकी पाँटीगने जुन्या आठवणींना उजाळा देताना, २००३ साली अंतिम सामन्यात वापरलेल्या बॅटचा फोटो पोस्ट केला.

मात्र भारतीय चाहत्यांनी या फोटोवर, आपली बऱ्याच वर्षांपासूनची शंका पाँटींगला विचारली…

अंतिम सामन्यात केवळ दोन बळी गमावत ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल भारताचे फलंदाज ४० षटकांत २३४ धावांपर्यंत मजल मारु शकले. साखळी फेरीपर्यंत चांगली कामगिरी करणारे भारतीय फलंदाज अंतिम सामन्यात पुरते अपयशी ठरले होते. यानंतर भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषक जिंकला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ricky ponting shares photo of world cup 2003 final bat gets one query from indians psd
First published on: 23-03-2020 at 18:54 IST