भारतीय संघाचा नवा फिनिशर म्हणून उदयास येत असलेल्या रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिमाखदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान रिंकूने लगावलेल्या एका षटकाराने मैदानातील मीडिया बॉक्सची काचच फुटली.

भारतासाठी खेळताना रिंकूचं हे पहिलंच अर्धशतक आहे. या खेळीदरम्यान रिंकूने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले. यापैकी एक षटकार रोरावत मीडिया बॉक्सच्या दिशेने गेला. काचेचा बॉक्स असल्याने रिंकूच्या तडाख्याने काच फुटली. रिंकूच्या या तडाखेबंद षटकाराने कोणालाही इजा झाली नाही. मीडिया बॉक्समधल्या फुटलेल्या काचेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रिंकूने ३९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची वेगवान खेळी केली. भारताने रिंकूच्या खेळीच्या बळावर १८० धावांची मजल मारली. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य देण्यात आलं. आफ्रिकेने ५ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं.

What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल

आणखी वाचा-IND vs SA 2nd T20: सूर्यकुमार-रिंकू सिंहचे अर्धशतक व्यर्थ! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून दणदणीत विजय

मूळच्या अलीगढच्या रिंकूने आयपीएल स्पर्धेत खेळताना अशाच स्वरुपाच्या खेळी केल्या आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात रिंकूने सामन्याच्या शेवटच्या षटकात ५ चेंडूत ५ षटकारांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सविरुध्द थरारक विजय मिळवून दिला होता.

आणखी वाचा-कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत; उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सवर ४-३ अशी मात

सिलिंडर गॅसचे वितरण करणाऱ्या कंपनीत रिंकूचे बाबा काम करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही रिंकूने क्रिकेटची आवड जोपासली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळताना रिंकूने सातत्याने धावा केल्या आहेत.

यावर्षी आयर्लंडविरुध्द डब्लिन येथे रिंकूने भारतासाठी पदार्पण केले.